Jalna : ‘सीड हब’मध्ये आता ‘सीड पार्क’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेमका फायदा काय ?

एवढेच नाही तर त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. त्यानंतर आता जालना येथे सीड पार्क उभारले जाणार आहे. गेल्या 5 वर्षापासून हा प्रोजेक्ट रखडलेला होता. अखेर महाबीजकडून प्रकल्प आराखडा कृषी सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये सीड पार्क उभारले जाणार असल्याचे महाबीजच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Jalna : 'सीड हब'मध्ये आता 'सीड पार्क', मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेमका फायदा काय ?
सोयाबीन बिजोत्पादन
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:33 PM

औरंगाबाद : (Marathwada) मराठवाड्यातही मोसंबीचे क्षेत्र हे वाढत आहे. काढणी झालेल्या फळपिकांचा दर्जा सुधारण्यासाठी त्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे. त्याचअनुशंगाने मराठवाड्यातील पैठण येथे तब्बल 62 एक्कर जागेमध्ये ‘सिट्रस इस्टेट’ स्थापना करण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वीच झाली होती. एवढेच नाही तर त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. त्यानंतर आता (Jalna) जालना येथे (Seed production) सीड पार्क उभारले जाणार आहे. गेल्या 5 वर्षापासून हा प्रोजेक्ट रखडलेला होता. अखेर महाबीजकडून प्रकल्प आराखडा कृषी सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये सीड पार्क उभारले जाणार असल्याचे महाबीजच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारचा काय आहे उद्देश?

सध्या भाजीपाला आणि विविध पिकांच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम शेतकरी राबवत आहेत. जालना प्रमाणेच बुलडाणा येथेही हा प्रयोग केला जात आहे. शेतकऱ्यांबरोबर शेतकरी कंपन्याही यामध्ये उतरल्या आहेत. मात्र, शेतकरी हे केवळ बिजोत्पादनापुरतेच मर्यादित न राहता बियाणे उद्योजक व्हावेत याच अनुशंगाने सीड पार्क हे जालना येथे उभारले जाणार आहे. तशा प्रकारचा निर्णय झाला असून या सीड पार्कमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा राहणार आहेत. बियाणावर प्रक्रिया कामी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहेत. एकाच छताखाली सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. याकरिता 85 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कशामुळे रखडले होते काम?

जालन्यात माती परीक्षण व शेतकऱ्यांना शेतीमाल ठेवण्यासाठी गोदाम एवढा उद्देश ठेऊन तत्कालीन मंत्री बबराव लोणीकर यांनी सीड पार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या यंत्रणेअंतर्गत पार्क उभारण्याची हलचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, निधी अभावी हे काम रखडले होते. असे असतानाही एक खासगी कंपनी समोर आली होती. पण अधिकचे पैसे मागणी केल्याने या पार्कचे काम लांबणीवर पडले होते. आता ते मार्गी लागतील अशी आशा आहे. महाबीजकडून प्रस्ताव सादर केल्यामुळे सीड प्रोजेक्ट उभा राहिल असे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

अभिनेता जॅकी श्रॉफचा लाख मोलाचा सल्ला ठरला शेतकऱ्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट, आता अडीच एकरामध्ये 70 पीकं

Pomegranate : मुख्य आगारातून डाळिंब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहेत कारणे?

निसर्गाचा लहरीपणा कायम : बदलत्या वातावरणाचा परिणाम आता थेट रब्बीच्या उत्पादनावरच

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.