AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded: उन्हाच्या झळा त्यात बुरशीचा प्रादुर्भाव, 20 वर्षापासून मोसंबी फळबाग जोपसणाऱ्या शेतकऱ्याची अनोखी कहाणी

असे म्हणतात एखाद्या व्यवसायामध्ये 3 वर्ष सातत्य ठेवले तर त्या व्यवसायाचा जम बसतो. मात्र, शेती याला अपवाद आहे. कारण 3 नव्हे तर गेली 20 वर्ष मोसंबी फळबागाची जोपासणा करुन नांदेडच्या शेतकऱ्याला अद्यापही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेमंत पाटील यांनी 20 वर्षापूर्वी 350 मोसंबीची लागवड केली होती. मात्र, बुरशीजन्य रोगामुळे वर्षाकाठी 5 ते 6 झाडे ही नष्ट होत आहेत.

Nanded: उन्हाच्या झळा त्यात बुरशीचा प्रादुर्भाव, 20 वर्षापासून मोसंबी फळबाग जोपसणाऱ्या शेतकऱ्याची अनोखी कहाणी
वाढत्या उन्हामध्ये फळबागांचे व्यवस्थापन गरजेचे आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:16 AM

नांदेड : असे म्हणतात एखाद्या व्यवसायामध्ये 3 वर्ष सातत्य ठेवले तर त्या व्यवसायाचा जम बसतो. मात्र, (Farming) शेती याला अपवाद आहे. कारण 3 नव्हे तर गेली 20 वर्ष (Mosambi Orchard) मोसंबी फळबागाची जोपासणा करुन (Nanded) नांदेडच्या शेतकऱ्याला अद्यापही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेमंत पाटील यांनी 20 वर्षापूर्वी 350 मोसंबीची लागवड केली होती. मात्र, बुरशीजन्य रोगामुळे वर्षाकाठी 5 ते 6 झाडे ही नष्ट होत आहेत. फळबाग जोपासण्यासाठी ठिबक सिंचन, औषध फवारणी वेळच्यावेळी केल्यानंतर अपेक्षित उत्पादन मिळते मात्र, व्यापारी अन् किरकोळ विक्रेत्यांच्या तावडीतून योग्य दरच पदरी पडत नाही. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारभावातील फटका यामुळे गेल्या 20 वर्षात शेती व्यवसाय काही उबदार आल्याचे चित्र नाही.

दीड एकरामध्ये 250 मोसंबीची झाडे

पारंपरिक पिकांना बाजूला सारत हेमंत पाटील यांनी तब्बल 20 वर्षापूर्वी मोसंबी फळबागेचा प्रयोग केला होता. दर्जेदार आणि केमिकल मुक्त फळ ग्राहकांना मिळावे म्हणून त्यांनी सेंद्रीय पध्दतीने बाग जोपासण्याचा निर्धार केला होता. यामुळे मात्र, उत्पादनात घटच होत गेल्याने पुन्हा त्यांनी रासायनिक खतांचा वापर सुरु केला होता. असे असले तरी मोसंबी बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्यांची 100 झाडे ही नष्ट झाली असून यंदा तर बुरशीबरोबर वाढत्या उन्हाचाही परिणाम झाला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील घटते दर यामुळे गेल्या 20 वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कष्ट शेतकऱ्यांचे फायदा व्यापाऱ्यांना

केवळ उत्पादन वाढून उपयोग नाहीतर बाजारपेठेतील दरावरही सर्वकाही अवलंबून आहे. शेतकरी स्वत:चा शेतीमाल स्वत: विकू शकत नाही. याकरिता व्यापाऱ्यांची मध्यस्ती ही ठरलेलीच आहे. त्यामुळे शेतीमाल पिकवणे हातामध्ये असले तरी त्याचे मूल्य हे व्यापारी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा अधिकचा फायदा हा व्यापारी आणि किरकोळ विक्रत्ये यांना होत आहे.

यंदा वाढत्या उन्हाबरोबर बुरशीचा प्रादुर्भाव

फळबागांवरील बुरशीमुळे वर्षाकाठी मोसंबीची झाडे ही नष्ट होत आहेत. त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असून हे कमी म्हणून की काय यंदा वाढत्या उन्हाचाही धोका निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे फळांची गळती होतेय. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडांवर बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढलंय. सध्या बाजारात मोसंबीची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे पण उत्पादनात घट झाली आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?

Washim : निर्णय झाला पण दिलासा नाही, शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर टांगती तलवार

Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.