Shaheed Diwas 2021: शहीद भगतसिंह यांनी फाशीपूर्वी शेतकऱ्यांबद्दल काय म्हटलं होतं?
क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रज सरकारनं ज्यादिवशी फाशी दिली तो दिवस म्हणजे 23 मार्च 1931 होय.
मुंबई: क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रज सरकारनं ज्यादिवशी फाशी दिली तो दिवस म्हणजे 23 मार्च 1931 होय. शहीद भगतसिंह यांना शेतकरी आणि कामगारांविषयी आत्मीयता असल्याचं त्यांच्या लेखनातून दिसून आलेलं आहे. भगतसिहं यांनी फाशीच्या पूर्वी 2 फेब्रुवारी 1931 रोजी नवयुवक राजकीय कार्यकर्त्यांना पत्र लिहीलं होतं. भगतसिहं यांनी क्रांतीचं जे उद्दीष्ठ ठेवलं होतं त्यामध्ये जमीनदारी प्रथेचा शेवट आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देखील समाविष्ट होता. भगतसिंह यांच्या लेखनामध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य दिसून येतं. (Shaheed Diwas 2021 Bhagatsingh thoughts on farmers)
शेतकरी आणि कामगारांनी एकत्र यावं
यादवेंद्र संधू यांनी सांगतात की,’ देशाची लढाई लढायची असल्यास मजूर, शेतकरी आणि सामान्य जनतेने पुढं यायला हवं, त्यांना लढाईसाठी संघटीत केलं पाहिजे. नेते त्यांना पुढं आणण्यासाठी काही करु शकत नाहीत ते करु शकत नाहीत. शेतकरी मजुरांना परदेशी सरकार, जमीनदार आणि भाडंवलदार यांच्या जाचातून मुक्तता होण्यासाठी संघटीत व्हावं लागेल, असं भगतसिंह लिहीतात.
शेतकरी आंदोलन आणि भगतसिंह
भगतसिंह यांचं कुटुंब आणि शेतकरी यांचं नात खूप जुनं आहे. त्यामुळेच केंद्र सरकार लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात ठिकठिकाणी शहीद भगतसिंह यांचे फोटो पाहायला मिळतात. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शहीद दिवसानिमित्त शेतकऱ्यांना भगतसिंह यांना आवडणारी पिवळी पगडी घालण्याचं आवाहन केलं आहे. शहीद भगतसिंह यांच्या कुटंबातील यादवेंद्र सिहं संधू हे देखील शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आहेत. ते ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात.
पगडी संभाल जट्टा आंदोलनाचे नायक अजित सिंह
इंग्रज सरकारच्या काळात म्हणजेच सुमारे 114 वर्षांपूर्वी पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं शोषण करणारं आबादकारी बिल -1906 आणलं गेलं होते. या बिलनुसार शेतकऱ्यांच्या जमीन हडपून सावकारांना देण्यात येणार होत्या. त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील झाडं कापण्याची परवानगी नव्हती. झाड कापल्यास ती जमीन 24 तासात सरकारच्या नावावर होणार होती.
दोआबच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरील कर दुप्पट करण्यात आला होता. या कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. ज्याचं नेतृत्व अजित सिंह करत होते. 22 मार्च 1907 रोजी लायलपूर येथे शेतकऱ्याची सभा झाली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शोषणावर झंग स्याल पत्रिकेचे संस्थापक लाला बांके दयाल यांनी पगडी संभाल जट्टा ही कविता सादर केली होती. हे आंदोलन पुढे नऊ महिने सुरु होते. शेतकऱ्यांच्या एकतेपुढे इंग्रज सरकारला झुकावं लागलं होते.
Loan Moratorium वर कोर्टाचा मोठा निर्णय, सरकारच्या पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करण्यास थेट नकारhttps://t.co/OoJ018NvSk#loanmoratorium #loanmoratoriumcase #LoanCharge #SupremeCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2021
संबंधित बातम्या
Weather Alert | जळगावला अवकाळी पावसाचा फटका, 1391.20 हेक्टरवरील मका मातीमोल
(Shaheed Diwas 2021 Bhagatsingh thoughts on farmers)