50% अनुदानावर करा शेळीपालन, पहिल्या टप्प्यात कोणत्या तीन जिल्ह्यांना मिळणार लाभ ?

सध्या बाजारात बोकडाचे दर आणि वाढणारी मागणी पाहता शेती व्यवसायाला हा जोड व्यवसाय दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढणारच आहे पण शेतकरी हा समृध्दही होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारडून याला कशा स्वरुपात अनुदान मिळते. त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणार आहोत. अनुदान मिळवायचे असल्यास काय करायचे हे माहिती असणे आवश्यक आहे...

50% अनुदानावर करा शेळीपालन, पहिल्या टप्प्यात कोणत्या तीन जिल्ह्यांना मिळणार लाभ ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 11:36 AM

लातूर : आजही केवळ शेती या मुख्य व्यवसयावर अवलंबून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. नैसर्गिक संकट, बाजापभाव यामुळे उत्पादनाबद्दल कायम शंका शेतकऱ्यांच्या मनात असते. त्यामुळे शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय असायलाच पाहिजे. मात्र, सुरवात कशाने करायची असे अनेक विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात. परंतु, (Goat Rearing Business) शेळीपालन हा जोडव्यवसाय शेतकऱ्यांसाठी संयुक्तीक असून या व्यवसयाकरिता सरकारही पाठबळ देत आहे. सध्या बाजारात बोकडाचे दर आणि वाढणारी मागणी पाहता शेती व्यवसायाला हा जोड व्यवसाय दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढणारच आहे पण शेतकरी हा समृध्दही होणार आहे. (grant from the government) त्यामुळे राज्य सरकारडून याला कशा स्वरुपात अनुदान मिळते. त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणार आहोत. अनुदान मिळवायचे असल्यास काय करायचे हे माहिती असणे आवश्यक आहे…

काळाच्या ओघात उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा कलही जोडव्यवसायाकडे वाढत आहे. शिवाय हा व्यवसाय शेती संबंधीच असल्याने यामध्ये काही अडचणी निर्माण होत नाहीत. शेतकऱ्यांसाठी ते सहज शक्य होत आहे. शिवाय तरुणांना देखील आपला एखादा व्यवसाय उभारण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याकरिता 50 टक्के अनुदानही मिळते. मात्र, त्यासाठी आवश्यक पध्दती माहीत असणे आवश्यक आहे.

शेळी पालन अनुदान योजना महराष्ट्र 2021 अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या अनुशंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा तसेच दुसर्‍या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्हयांसाठी 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ही योजना राबवली जात आहे.

व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान

शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला 2 लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्यांसाठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्यास पदरुन करायची आहे. प्रत्येक प्रवर्गासाठा हीच अट असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिली जाणार आहे. मात्र, याकरिता सर्व प्रकल्प उभा करुन अनुदानाची प्रक्रीया करता येणार आहे.

20 शेळ्या, 2 बोकड योजना :

योजनेचे स्वरुप हे सरकारने ठरवून दिलेले आहे. या पध्दतीने शेळी आणि बोकडाची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरुपात किंवा शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार सुरु करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या 6 हजार रुपये किमतीच्या तर 2 बोकड हे 8 हजार रुपये किमतीचे खरेदी कराव्या लागणार आहेत. म्हणजे एकूण 1 लाख 36 हजाराची खरेदी करावी लागणार असून अनुदानस्वरुपात शेतकऱ्यांना 68000 हजार रुपये हे मिळणार आहेत. तर शेळ्यांच्या गोठा 450 चौ.फु बांधावा लागणार आहे. 212 चौ.फु यामप्रमाणे गोट्याला 95000 हजार रुपये खर्च येणार असून पैकी 47500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपाच मिळणार आहे. (Shelapalan agribusiness to get good returns, 50% subsidy)

संबंधित बातम्या :

राज्यानंतर केंद्राचीही नुकसानभरपाई, कशी होते रक्कम खात्यामध्ये जमा ?

कपाशीची वेचणी तर झाली पण, अद्याप खरेदी नाही, वाशिममधील कापूस उत्पादक शेतकरी संकटात

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.