ओ भाऊ, रोजंदारीने या अन्यथा गुत्ते घ्या पण हरभरा वावरच्या बाहेर काढा..! पीक जोमात काढणीविना कोमात

बघता...बघता खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम टप्प्यात कुठला हरभरा तर काढणीला सुरवातही झाली आहे. यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादन वाढीचीही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण थेट उत्पादनापर्यंत पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागत आहे. यापूर्वी निसर्गाचा लहरीपणा, रोगराईचा प्रादुर्भाव याचा सामना करुन आता कुठे पीक काढणीला आले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे.

ओ भाऊ, रोजंदारीने या अन्यथा गुत्ते घ्या पण हरभरा वावरच्या बाहेर काढा..! पीक जोमात काढणीविना कोमात
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:02 AM

नांदेड : बघता…बघता खरीपापाठोपाठ (Rabbi Season) रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम टप्प्यात कुठला हरभरा तर काढणीला सुरवातही झाली आहे. यंदा (Chickpea Crop) हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादन वाढीचीही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण थेट उत्पादनापर्यंत पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागत आहे. यापूर्वी निसर्गाचा लहरीपणा, रोगराईचा प्रादुर्भाव याचा सामना करुन आता कुठे पीक काढणीला आले आहे. असे असतानाही (Farmer) शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे. आता उन्हाचा तडाका वाढत आहे.त्यामुळे हरभरा कडकून जात असून योग्य वेळी काढणी महत्वाची आहे. पण काढणीला मजूरच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. रोजंदारीमध्ये वाढ करुनही मजूर मिळत नाहीत तर हरभरा काढणीच्या गुत्त्याचे दर गतवर्षीपेक्षा वाढलेले आहेत. त्यामुळे पीक जोमात असले तरी पदरी पडेपर्यंत शेतकऱ्यांच्या जीव टांगणीलाच हे सध्याच्या परस्थितीवरुन लक्षात येत आहे.

म्हणून मजूर टंचाईचा सामना

यंदा रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी या पिकावर भर दिला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील हरभरा पीक काढणीला आहे. पण मजूर मिळत नसल्याने काढणी कामे ही रखडलेली आहेत. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन अशी परस्थिती होती. त्यामुळे शहरातील तरुण हे गावाकडे मार्गस्थ झाले होते. त्यामुळे मजूरांचा प्रश्न मिटलेला होता. पण आता नियमावलीत बदल करण्यात आला असून सर्वकाही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाचे पुन्हा शहराकडे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे मजूरांची समस्या उद्भवत आहेत. एकाच वेळी पिकांची काढणी कामे सुरु झाल्याने नेमके काय करावे या मनस्थितीमध्ये शेतकरी आहे.

दिवसाला 400 रुपये मजूरी

रब्बी अन् खऱीप हंगामातील पीक काढणीच्या प्रसंगी मजूरांच्या रोजंनदारीचे दर वाढतातच. पण यंदा दर वाढूनही मजूर मिळत नाहीत हे विशेष. यंदा हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र काढणी कामे सुरु झाली आहेत. प्रत्येकालाच काढणीवर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून मजूरांनी 400 रुपये अशी मजूरी केली आहे. असे असूनही मजूर कामासाठी मिळत नाहीत. ग्रामीण भागात पीक काढणी हे गुत्तेच म्हणजे एकरी दर ठरवून दिले जाते पण मजूरांची मानसिकताच नसल्याने अंतिम टप्प्यात आता काढणीविना पिकांचे नुकसान होत आहे.

हरभऱ्याच्या वजनात घट

काढणीला आलेल्या पीकाची वेळेत काढणी झाली नाहीतर मात्र, वजनावर त्याचा परिणाम होतो. सध्या ऊसाचीही अशीच अवस्था आहे. शिवाय आता रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. हरभऱ्याच्या काढणीला विलंब झाला तर मात्र, वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे उत्पन घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : पंजाबच्या गायी अन् दर्जेदार दूधावर भर, गावाबाहेर न जाता लाखांच्या घरात उलाढाल! त्यानं करून दाखवलंच!

महावितरणकडून सुविधांपेक्षा अडचणी अधिक, थकबाकी अदा करुनही समस्या कायम, काय आहे बांधावरची स्थिती?

Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा ‘आधार’?

https://www.youtube.com/watch?v=DyCk29KK144

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.