पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. यापूर्वी पीएम किसान योजनेत अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, 'या' कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. यापूर्वी (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेत अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी (Central Government) सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, केवळ त्या (Farmer) शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा लाभ मिळणार आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते. कागदपत्राबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

असा झाला नव्याने बदल

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा राशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहेत. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शिवाय आता KYC ही अदा करावी लागणार आहे.

अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत

शेतकऱ्यांच्या हीतासाठी पीएम किसान योजना ही सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, योजनेच्या सुरवातीला अनेकजण पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला होता. महाराष्ट्रातही अनाधिकृतपणे अनेकांनी पैसा घेतलेले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख शेतकरी असे आहेत जे या योजनेत पात्र नाहीत. आता त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण हे शेतकरी या योजनेत अपात्र आढळले आहेत. त्यामुळे अटी व शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत, प्रत्येकी 2 हाजर रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

यंदाच्या वर्षात असा होणार हप्ता जारी

पहिला हप्ता – एप्रिल-जुलै

दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर

तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च

यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करा.

उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.

त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.

आता पर्यायातून Beneficiary Statusवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाईल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.

वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्हाला तुमचे नाव तिथे दिसेल.

संबंधित बातम्या :

Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग

सोयाबीनच्या दराचा परिणाम आवकवर, शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा का नुकसानीचा?

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.