महाअभियनातून वाढणार रेशीम उद्योग, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ
मराठवाड्यात देखील बीड सारख्या जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. एवढेच नाही तर बीडमध्ये खरेदी-विक्री केंद्रही सुरु करण्यात आले आहे. रेशीम उद्योगाची समृध्दी व्हावी याकरिता आाता महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून मराठवाड्याती शेतऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
लातूर : रेशीम उद्योगामध्ये वाढ होत आहे. मात्र, मोजकेच शेतकरी या उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत. मराठवाड्यात देखील बीड सारख्या जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. एवढेच नाही तर बीडमध्ये खरेदी-विक्री केंद्रही सुरु करण्यात आले आहे. रेशीम उद्योगाची समृध्दी व्हावी याकरिता आाता महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून मराठवाड्याती शेतऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग केला आहे त्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. याकरिता नाव नोंदणी, नर्सरी आणि प्रशिक्षण या तीन टप्प्यातून ज्या शेतरकऱ्यांनी मार्गक्रमण केले आहे. ते शेतकरी हे यशस्वी झाले आहेत या रेशीम संचानलायाचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आणि रेशीम क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने हे अभियान पार पडणार आहे.
समृध्दी बजेट सादर करण्याची संधी
आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी तंत्रशुध्द पध्दतीने रेशीम लागवड केली आहे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्याला त्याला जोडून मनरेगामधून आता रेशीम उद्योगासाठी समृद्धी बजेट सादर करण्याची संधी मिळावी, या उदेशाने डिसेंबरला सुरू होणारे महारेशीम अभियान नोव्हेंबरपासूनच राबविण्याचा निर्णय रेशीम संचालनालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. या अभियानाचा लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील होणार आहे.
काय आहे अभियानाचा उद्देश?
दरवर्षी तुतीच्या लागवडीचा लक्षांक जिल्ह्याला ठरवून दिलेला असतो तर तो पूर्ण करण्याची जबाबदारीही संचानलयाच्या कर्मचाऱ्यांवरच असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणे, लागवडीपूर्वी प्रशिक्षण देणे, वेळेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे, वेळेत नर्सरी तयार करण्यासाठीची पूर्वतयारी करणे, मनरेगाच्या प्रस्तावास ग्रामसभेचा ठराव घेणे, लेबर बजेट मंजूर करून घेणे, प्रस्तावास तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी, कार्याला मंजूरी वेळेत प्राप्त करून घेणे, पोकरासारख्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करून अंमलबजावणी करणे, रेशीम उद्योगासंबंधीच्या इतर योजनांचा प्रसार करणे आदी उदेश हे महारेशीम अभियानातून साध्य केले जाणार आहेत.
अशी असणार आहे अभियनाची रुपरेशा..
नाव नोंदणी केल्यानंतर फेब्रुवारीपूर्वी नर्सरी तयार झाल्यास प्रशिक्षण घेऊन जून-जुलैमध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योगाला सुरुवात केली जाणार आहे. योग्य नियोजनामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा मराठवाड्याला 2075 एकर, पश्चिम महाराष्ट्रासाठी 1600 एकर, अमरावती विभागासाठी 900 एकर, तर नागपूर विभागासाठी 350 एकर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० एकर तुती लागवड कार्यक्रम देण्यात आला असल्याचे रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके यांनी सांगितले आहे.