मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. पण आता (4 डिंसेबर) उद्यापासून बर्फवृष्टी आणि पावसाचाही सामना करावा लागणार आहे. पण ही समस्या उत्तर भारतामध्ये उद्भवणार असल्याचा अंदाज (skymet weather ) स्कायमेट या हवामान एजन्सीने वर्तवलेला आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी जर उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख या भागातील पर्वतरांगामध्ये हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तर 5 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश ते तसेच पुढे उत्तराखंड आणि संपूर्ण डोंगराळ भागात ही अशीच परस्थिती राहणार असल्याचे स्कायमेटच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या आठवड्याचा शेवट तुम्ही जर उत्तर भारतामध्ये करणार असताल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पाऊस तर बरसणार आहेच पण येथील पर्वतरांगावरुन बर्फवृष्टी देखील होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये पाऊस आणि तापमानात देखील अमूलाग्र बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सर्व बदल पश्चिमात्य भागात झालेल्या अभूतपुर्व परस्थितीमुळे होत असल्याचेही या स्कायमेटने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 4 डिसेंबरपासून वातावरणात बदल तर होईलच पण पुढे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात बर्फवृष्टी होणार आहे. ही बर्फवृष्टी उच्च किंवा मध्यम भागातील पर्वतरांगावर होणार आहे. एवढेच नाही तर दरम्यानच्या काळात पाऊसही बरसणार असल्याचा वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये उद्यापासून वातावरणात बदल होऊन बर्फवृष्टी होणार आहे. सलग तीन दिवस असेच वातावरण हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडात राहणार आहे. 6 डिसेंबरनंतर ही परस्थिती पुर्वपदावर येणार असून 7 डिसेंबरला या भागात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे या वातावरणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही पण जे प्रवाशी उत्तर भारतामध्ये जाणार आहेत त्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असून याचा सामना आता नागरिकांना करावा लागत आहे.
दरम्यानच्या काळात 5 डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा राज्यातील काही भागात पाऊस पडणार आहे तर दिल्लीमध्येही काही भागात याच दिवशी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतामधील पर्वतरांगामध्ये थंडीची लाट निर्माण झाली आहे.