सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल

सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) इतिहासामध्ये स्थापनेपासून आजपर्यंत पहिल्यांदाच 1200 कांदा (onion) गाड्यांची आवक झाली आहे.

सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती,
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 1:20 PM

सोलापूर: सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) इतिहासामध्ये स्थापनेपासून आजपर्यंत पहिल्यांदाच 1200 कांदा (onion) गाड्यांची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये झालेल्या विक्रमी आवकीमुळे आजची एका दिवसाची उलाढाल 16 कोटींच्या पुढे होणार असल्याची माहिती आहे.1961 पासून ही रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक झालीय.महाराष्ट्रातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती असणाऱ्या लालसगावच्या बाजार समिताली आज सोलापुर बाजार समितीने माग टाकलं असल्याचं बोललं जात आहे. भारतातील सर्वाधिक कांदा आवक होण्याचा विक्रम सोलापूर बाजार समितीच्या नावावर नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे.आज बाजार समितीत कांदा मोठ्या प्रमाणात आला असला तरी कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत.जास्त कांदा आवक झाल्याने कांदा बाजार पडू नये या साठी बाजार समिती मागील वेळे प्रमाणे व्यापारी उद्या कांदा व्यवहार बंद ठेवण्याची शक्यता आहे.

1961 पासूनची विक्रमी आवक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली होती. बाजार समितीच्या स्थापनेपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कांदा आवक पहिल्यांदा झाली आहे.

लासलगावला मागं टाकलं

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती समजली जाते. लासलगावच्या बाजारसमितीचा देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये मोठा बोलबाला आहे. मात्र, सोलापूर बाजार समितीत आज एकाच दिवशी तब्बल 1200 गाड्यांची आवक झाल्यानं लासलगावच्या बाजार समितीला कांद्यांच्या आवकीच्या बाबतीत मागं टाकल्याचं बोललं जातेय.

16 कोटींची उलाढाल

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्यांची विक्रमी आवक झाली आहे. कांद्याच्या 1200 गाड्यांची आवक झाल्यानं आजची कांद्याची उलाढाल 16 कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज बाजार समितीच्या जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बाजार समितीला उद्या सुट्टी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार उद्या बंद राहणार आहेत. बाजार समितीला उद्या सुट्टी राहणार असल्याची माहिती आहे.

कांद्याची विक्रमी आवक दर स्थिर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. आज बाजारात 1200 गाड्या कांदा आला असला कांद्याचे दर काही उतरले किंवा वाढलेले नाहीत. बाजार समितीत कांद्याचे स्थिर रिहल्याचं दिसून आलं आहे.

इतर बातम्या:

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?

केळीच्या दरात घसरण, आता लागवडीपासूनचे नियोजन गरजेचे, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

Solapur APMC record break onion came in APMC for sale in last 61 years

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...