SOLAPUR PUNE राष्ट्रीय महामार्गावरील केळी निर्यातीचे गोडाऊन पेटले, लाखो रूपयाचं नुकसान
डांबर काढून घेण्याचे बेकायदेशीर कृत्य करत असताना केळी निर्यात केंद्रांचे गोडाऊन पेटल्याची घटना शुक्रवारी (Friday) दुपारी सोलापुर(Solapur) पुणे (Pune) राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
सोलापूर – डांबर काढून घेण्याचे बेकायदेशीर कृत्य करत असताना केळी निर्यात केंद्रांचे गोडाऊन पेटल्याची घटना शुक्रवारी (Friday) दुपारी सोलापुर(Solapur) पुणे (Pune) राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. झालेल्या आगीच्या दुर्घटनेत तीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर काहीवेळात परिसरात अंधार पसरला होता. धुराचे लोट दिसत होते. आगीचे लोट पाहून घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली, तसेच आगीच्या घटना पाहण्यासाठी आलेल्या लोकांमुळे ट्रॅफिक झालं होतं. आगीत कसल्याची प्रकारची जीवितहानी झालेली नसून केळी निर्यात करणाऱ्या नऊ अद्यावत मशिनरी जनरेटरसह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. टेभुर्णी पोलिसांत घटनेची फिर्याद दाखल झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. बेकायदेशीर डांबर काढण्याचा उद्योग करणाऱ्यांचा व दोन्ही टॅकरचा पोलिस शोध घेत आहेत.
लाखो रूपयांचं साहित्य जळालं
पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आढेगाव शिवारात ही घटना घडली आहे.नागनाथ दत्तू चव्हाण व अजय नागनाथ चव्हाण यांचे त्यांच्या मालकीचे हे गोडाऊन बारामती (भवानीनगर) येथे आहे. त्यांनी परदेशी केळी निर्यात करणारे व्यापारी विजय फाळके यांना भाड्याने दिले आहे. या गोडाऊन मध्ये फाळके यांच्या मालकीचे नऊ जनरेटरसंच,लाखो पॉलिथिन बॅग व केळी पॅक करून परदेशात पाठवणे योग्य तयार करतात. लागलेल्या आगीत उच्चप्रतीचे बॉक्स व तसेच त्यांच्या मजुरांचे प्रापंचिक सामान, गॅस सिलेंडर, भांडी साहित्य जळून खाक झालंय. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रचंड नुकसान झालं असून पोलिस त्याची कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.