Marathwada : मूग, उडदाचा विषय मिटला आता सोयाबीन कापसावरच मदार, पेरणीचे असे आहेत टप्पे..!
सोयाबीन हे केवळ मराठवाड्यातीलच नाही तर राज्यातील खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. त्यामुळे सोयाबीनचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनी चिंता करु नये कारण या पिकाच्या पेरणीला उशीर झाला तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. शिवाय कमी कालावधीत येणारे सोयाबीन बियाणेही उपलब्ध आहेत.
औरंगाबाद : लांबणीवर पडलेल्या (Rain) पावसाचा परिणाम (Kharif Season) खरीप हंगामावर होणार नसल्याचे सांगितले होते पण आता परस्थिती बदलतेय. कारण राज्यात पावसाचे अनिश्चित स्वरुप असले तरी (Marathwada) मराठवाड्यात अजूनही आगमनच झालेले नाही. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीवर परिणाम होणार हे निश्चित. खरीप हंगमात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली तरी पहिला मान हा कडधान्यांनाच असतो. यामध्य प्रमुख्याने उडीद आणि मूगाचा समावेश होतो. कडधान्याचा पेरा 15 जूनपर्यंत झाला तरच अपेक्षित उत्पादन मिळते. पावसाची दडी अशीच राहिली तर उडीद, मूगाच्या पेरणीला ब्रेक देऊन इतर पिकांचा विचार शेतकऱ्यांना करवाच लागणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेरण्या झाल्या आहेत मात्र पेरलेल्या क्षेत्रावरही दुबारचे संकट ओढावणार की काय अशी स्थिती आहे.
नुकसान टाळण्यासाठी आंतरपिकाचा प्रयोग
पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी योग्य नियोजनच करावे लागणार आहे. ज्या पिकांमध्ये आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी होईल अशाच पिकांची निवड करावी लागणार आहे. उडीद आणि मूगाच्या पेरणीवर परिणाम होणार असल्याने साहजिकच सोयाबीनचे क्षेत्र वाढेल. त्यामुळे सोयाबीनमध्ये तुर, तीळ, बाजरी, भुईमूग आदी पिके घेऊन उत्पादनवाढीवर भऱ द्यावा लागणार आहे. आंतरपिकांची सांगड घातली तरच नुकसान टळून उत्पादनात वाढ होणार असल्याचा सल्ला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून देण्यात आला आहे.
असे असते खरिपातील पिकांच्या पेरणीचे स्वरुप
पावसाने वेळेत हजेरी लावली तर दरवर्षीप्रमाणे शेतकरी पेरणी करतात. पण यंदा ज्याप्रमाणे पावसाने हुलकावणी दिली तर मात्र, शेतकऱ्यांची गडबड होते आणि निर्णय चुकतात. त्यामुळे 70 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली तरच पेरणी हे सर्वात महत्वाचे आहे. 7 जून ते 8 जुलैपर्यंत भुईमूग, उडीद या पिकांची पेरणी करता येते तर याच कालावधीमध्ये अपेक्षित पाऊस झाला तर सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, कापूस, तीळ याचा पेरा करता येणार आहे. 16 जुलैनंतर मात्र, सोयाबीन, बाजरी, एरंडी, धने, तीळ याचेच उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
सोयाबीनबाबत निश्चिंत रहा
सोयाबीन हे केवळ मराठवाड्यातीलच नाही तर राज्यातील खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. त्यामुळे सोयाबीनचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनी चिंता करु नये कारण या पिकाच्या पेरणीला उशीर झाला तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. शिवाय कमी कालावधीत येणारे सोयाबीन बियाणेही उपलब्ध आहेत. उन्हाळी हंगामात सोयाबीनचे अधिक उत्पादन झाले तिथे खरिपात काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे सध्यच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनचा आधार मिळणार हे नक्की.