Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गादी वाफ्यावरील पेरणीच कांद्यासाठी वरदान, अवकाळीमुळे मात्र अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

अलिबागच्या तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला एक वेगळेच महत्व आहे. या कांद्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पांढरा कांदाही शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार असेच चित्र आहे. कारण पाणी साचणाऱ्या जागेवर लागवड करण्यात आलेल्या कांद्याची आता पुनर्लागवडच करावी लागणार आहे.

गादी वाफ्यावरील पेरणीच कांद्यासाठी वरदान, अवकाळीमुळे मात्र अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 7:02 PM

अलिबाग : अवकाळीमुळे केवळ फळबागा आणि मुख्य पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकालाही याचा फटका बसलेला आहे. ( Alibag)अलिबागच्या तालुक्यातील(white onion) पांढऱ्या कांद्याला एक वेगळेच महत्व आहे. या कांद्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पांढरा कांदाही शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार असेच चित्र आहे. कारण पाणी साचणाऱ्या जागेवर लागवड करण्यात आलेल्या कांद्याची आता ( replanting Sowing) पुनर्लागवडच करावी लागणार आहे. त्यामुळे पांढरा कांदा हा वेळेत तर बाजारात दाखल होणार नाहीच शिवाय आता लागवड लांबणीवर पडल्याने उत्पादनावर काय परिणाम होणार हे देखील पहावे लागणार आहे.

गादी वाफ्यावरील कांदा ‘सेफझोन’मध्ये

कांद्याचे भरघोस उत्पादन घेण्याच्या उद्देशाने त्याची लागवड ही गादी वाफ्यावर केली जाते. त्यामुळे वाफ्यात पाणीही साठवूण राहते आणि तणाचेही व्यवस्थापन करता येते. आता अवकाळी पावसाचे पाणी गादीवाफ्यात साचले असले तरी त्याचा कांदा पिकावर काहीही परिणाम झालेला नाही मात्र, पाणी साचणाऱ्या भागात लागवड केलेला कांदा धोक्यात आहे. या क्षेत्रावर अधिकचा काळ पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे नुकसान झाले असून पुनर्लागवडीशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे येथून पुढे लागवड केल्यास अलिबागच्या पांढरा कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे.

नव्याने लागवड कराताना ही काळजी घ्यावी

आता नव्याने लागवड करण्यात येणारा कांदा ही गादीवाफ्यावरच केलेली फायद्याचे राहणार आहे. एवढेच नाही तर वाफ्यात पाणी साचून राहू नये म्हणून चरद्वारे पाणी काढून देणे महत्वाचे राहणार आहे. रोपाची लागवड करताना सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत हे प्रति चौरस मीटरला 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर, 10 ग्रॅम निंबोळी पावडर प्रति चौरस मिटरला 50 ग्रॅम याप्रमाणे मातीत मिसळून गादी वाफे तयार करणे गरजेचे आहे.

असे करा रोपांचे व्यवस्थापन

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे रोपे ही जागेवरच जळत असतील तर सिलीकॅान अधिक स्टीकर किंवा सुक्ष्म अन्नघटक म्हणून चिलेटेड झिंक 2 ग्रॅम किंवा 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांदा रोपाची मर होत असेल तर मात्र, मेटालेक्सिल 8 टक्के अधिक मन्कोजेब 64 टक्के हे पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाला सोडावे.

फवारणी करताना अशी घ्या काळजी

रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी झॅाक्सिस्ट्रोबीन 11 टक्के अधिक टेब्युकोनझोल 18.3 टक्के, 10 मिली अधिक क्विनॅाल फॅास 15 मिली किंवा क्लोरोपायरीफॅास 15 मिली याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवडीनंतर 15 दिवसांनी पुन्हा याचप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे.

तालुक्यात 300 हेक्टरावर पांढरा कांदा

अलिबागचा पांढरा कांदा हा चवीला गोड आहे. याची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यातील कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या गावच्या शिवारात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी 270 हेक्टरावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा क्षेत्रात वाढ होणार होती पण अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल वातावरणामुळे सरासरी एवढ्याच क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळी पावसामुळे शेती व्यवसयाची समीकरणेच बदलणार, 3 वर्षांमध्ये 26 लाख हेक्टरावरील शेतीचे नुकसान

…अखेर ज्याची भीती होती तेच झाले, ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात पिक विम्याचे पैसे अडकले

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.