सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची

ज्याची प्रतिक्षा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना होती त्या सोयाबीनच्या दराबाबत सकारात्मक चित्र सध्या दिसू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. तर शनिवारी सोयाबीनची आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीपासून दरात घट असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा होती. पण दिवाळीनंतर चित्र हे बदलत आहे. शनिवारी सोयाबीनला पोटलीमध्ये 5350 चा दर मिळाला होता.

सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 3:03 PM

लातूर : ज्याची प्रतिक्षा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना होती त्या (Soybean prices) सोयाबीनच्या दराबाबत सकारात्मक चित्र सध्या दिसू लागले आहे. (Latur market) गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. तर शनिवारी सोयाबीनची (soybean arrivals) आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीपासून दरात घट असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा होती. पण दिवाळीनंतर चित्र हे बदलत आहे. शनिवारी सोयाबीनला पोटलीमध्ये 5350 चा दर मिळाला होता. मुहुर्ताच्या दरानंतर हा सर्वाधिक दर मानला जात आहे. अशी वाढ होत गेली तर शेतकऱ्यांना अपेक्षित दर प्रत्यक्षात मिळेल आणि झालेले नुकसान भरुन काढण्यास हातभार लागेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दिवाळीपूर्वी आणि नंतर सोयाबीनच्या बाजारपेठेत मोठे बदल झाले आहेत. याकरिता केंद्र सरकारचे धोरणही परिणामकारक असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. कारण कडधान्यावरील साठा मर्यादेची मुदत ही 31 ऑक्टोंबर ही होती. त्यानंतर मात्र, कडधान्याची साठवणूक करायची की नाही याबाबत सरकारने खुलासाच केला नाही. मात्र, आता व्यापारी साठवणूकीवर भर देत आहेत. त्यामुळेच सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र, बऱ्याच प्रतिक्षेनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे.

सलग दोन दिवस वाढले दर

दिवाळीनंतर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र, शुक्रवारपासून दरात सुधारणा होत आहे. शुक्रवारी पोटलीत 5250 तर आज (शनिवारी) 5350 चा दर मिळालेला आहे. आतापर्यंत दर स्थिर राहिले तरी समाधान व्यक्त केले जात होते. पण आता दर दिवसागणिस वाढत असल्याने शनिवारी आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजार हा मुहूर्ताचा दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या होत्या. योग्य दर मिळत नाही तोपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता.

दरच दर टिकून राहतील

शनिवारी सोयाबीनला सौद्यामध्ये 5630 चा भाव निघाला होता. मात्र, पोटलीत 5350 दर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मात्र, हाच दर टिकवून ठेवायचा असेल तर सोयाबीनची आवक एकदम न वाढू देता टप्प्याटप्प्याने आवक होणे गरजेचे आहे. आता 16 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. यापेक्षा अचानक आवक वाढली तर दर कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे आवक याच प्रमाणात राहणे तेवढेच महत्वाचे आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6100 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5200, चना मिल 4850, सोयाबीन 5630, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7150 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

डाळिंबाच्या दरात घट, फळबागायत शेतकऱ्यांचा साठवणुकीवरच भर

कृषीपंपाचे नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे

पुन्हा पावसाचा अंदाज, रब्बीसह खरिपातील पिकांची ‘अशी’ घ्या काळजी..!

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.