सलग दोन दिवस बाजार बंद नंतर काय आहे सोयाबीनचा दर ? आवक मात्र विक्रमी
आज (गुरुवारी) बाजारात काय होणार याकडे सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अपेक्षेप्रमाणे काहीही झाले नाही. सोयाबीनचे दर हे स्थिरच राहिले होते. जमेची बाजू म्हणजे विक्रमी आवक होऊन देखील हे दर स्थिर राहिले यातच शेतकऱ्यांनी समाधान मानले आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढले नाही तरी चालेल पण आहे ते दर टिकीन रहावेत हीच अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लातूर : गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार हे ठप्प होते. तत्पूर्वी सोयाबीनचे दर हे घसरले होते. सोयाबीनला 4 हजार 900 चा मिळाला होता. त्यामुळे आज (गुरुवारी) बाजारात काय होणार याकडे सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अपेक्षेप्रमाणे काहीही झाले नाही. सोयाबीनचे दर हे स्थिरच राहिले होते. जमेची बाजू म्हणजे विक्रमी आवक होऊन देखील हे दर स्थिर राहिले यातच शेतकऱ्यांनी समाधान मानले आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढले नाही तरी चालेल पण आहे ते दर टिकीन रहावेत हीच अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागातील सोयाबीनची काढणी-मळणी हा कामे आटोक्यात आलेली आहेत. गुरुवारच्या सोयाबीनच्या आवक वरुनच हे स्पष्ट झाले आहे. या हंगामात प्रथमच 42 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आता पर्यंत 10, 20 हजार क्विंटल होणारी आवक अचानक वाढलेली आहे. मात्र, दरात थोडाही फरक पडलेला नाही. सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळालेला आहे. चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 5 हजार तर इतर सोयाबीनला त्याच्या दर्जानुसार दर दिला जात आहे,
खराब सोयाबीनचीच आवक जास्त
पावसाने सोयाबीन डागाळलेले आहे. त्यामुळे याची साठवणूक केली तर बुरशी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल त्या दराच सोयाबीन विक्री करण्याची मानसिकता ही शेतकऱ्यांची झाली आहे. शिवाय आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्याने दर मिळत नाही. मात्र, सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना केवळ कष्टच करावे लागले आहे. अंतिम टप्प्यात पावसाचा हाहाकार यामुळे सोयाबीन केव्हा बाजारात विकले जाईल याचे वेध शेतकऱ्यांना होते. त्यामुळे दराची चिंता न करता सोयाबीन विक्रीवर भर देण्यात आला आहे.
सोयाबीनची विक्रमी आवक
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोयाबीनसाठी मराठवाड्यातच नाही तर राज्यात प्रसिध्द आहे. येथूनच सोयाबीनचे दर ठरतात. जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, सोलापूर, बिदर, कर्नाटक येथून सोयाबीनची आवक होत असते. यंदा मात्र, पावसाने सोयाबीन काढणीला अडथळा निर्माण झाला होता. आता पावसाने उघडीप दिल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, दर कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 42 हजार क्विंटल सोयाबीन मार्केमध्ये दाखल झाले होते. तर 5 हजाराचा दर मिळालेला होता. आता आवक वाढणार असल्याचे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे.
सणामुळे सोयाबीन विक्रीवर भर
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. खरीपातील एकाही पिकाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले नाही. यातच आता रब्बीची पेरणी तोंडावर आली असल्याने खर्च वाढलेला आहे. शिवाय दिवाळी तण आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6212 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6350 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5011 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4850, सोयाबीन 5330, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7422 एवढा राहिला होता.
संबंधित बातम्या :
द्राक्षे पिकावर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना
यंदा हरभरा क्षेत्रात दुपटीने होणार वाढ, काय आहेत कारणे ?
कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?