Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?

सध्या बाजारपेठेच्या केंद्रस्थानी खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभरा ही दोन पीके आहेत. दरातील चढउतारामुळे सोयाबीनवर शेतकऱ्यांच्या नजरा आहेत तर दुसरीकडे खरेदी केंद्र सुरु झाली असतानाही हरभऱ्याच्या आवकवर काय परिणाम होणार? हे पाहिले जात आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनचे दर स्थिर असूनही आवक मात्र कायम आहे.

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:57 PM

लातूर : सध्या बाजारपेठेच्या केंद्रस्थानी खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभरा ही दोन पीके आहेत. दरातील चढउतारामुळे  (Soybean Rate) सोयाबीनवर शेतकऱ्यांच्या नजरा आहेत तर दुसरीकडे खरेदी केंद्र सुरु झाली असतानाही (Chickpea Rate) हरभऱ्याच्या आवकवर काय परिणाम होणार? हे पाहिले जात आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनचे दर स्थिर असूनही आवक मात्र कायम आहे. (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 20 हजार तर हरभऱ्याची आवकही ही 30 हजार पोत्यांची झाली आहे. जिल्ह्यासह राज्यभर हरभरा खरेदी केंद्र सुरु झाली असल्याने खुल्या बाजारात हरभऱ्याच्या आवकवर परिणाम हा झालेला आहे. शिवाय खुल्या बाजारपेठेतील दरात वाढ नाही झाली तर खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात झाली असली तरी बाजारपेठेमध्ये मात्र, या दोन पिकांचीच चर्चा अधिक आहे.

दहा दिवसापासून सोयाबीनचे दर स्थिर

ज्या पध्दतीने मध्यंतरी सोयाबीनच्या दरात चढ-उतार झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष हे सोयाबीनच्या दराकडेच असते. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 300 रुपयांवर स्थिरावलेले आहे. असे असले तरी गतमहिन्याच्या तुलनेत हे दर चांगले असल्याने आवक ही 20 हजार पोत्यांची कायम आहे. अजूनही शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आवक नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. शेतकरी हरभऱ्याची विक्री आणि सोयाबीनची साठवणूक या पध्दतीचा अवलंब करीत आहे. म्हणजेच भविष्यात सोयाबीनच्या दरात वाढ होणार याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

खरेदी केंद्राचाही आधार

आतापर्यंत हरभऱ्याची विक्री ही खुल्या बाजारपेठेमध्येच होत होती. मात्र, बाजारपेठेतील दर 4 हजार 600 वरच अडकून बसलेले आहेत. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्र जवळ करु लागले आहेत. येथील नियम-अटी मान्य करुन शेतकरी नोंदणी करु लागले आहेत. केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 हा हमीभाव आहे तर खुल्या बाजारात सोमवारी 4 हजार 600 असा दर मिळाला आहे. आतापर्यंत नियम-अटीमुळे शेतकरी केंद्राकडे दुर्लक्ष करीत होता. पण बाजारपेठेतील दर असेच कमी होत असल्याने नोंदणी वाढत असल्याचे केंद्र चालक लालासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?

रोहयो : रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी!

Rabi Season : लगबग पीक काढणीची, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.