Kharif Season : यंदाही सोयाबीन-कापसावर भर, खत अन् बियाणांबाबत राज्य सरकराचे धोरण काय?

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. या कर्जाचा उपयोग खरीप हंगामपूर्व मशागती कामे करण्यासाठी व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत हे कर्ज वाटप करावे अशा सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी भुसे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना हे कर्ज सवलतीच्या दरात असणार आहे. शिवाय यंदा समाधानकारक पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kharif Season : यंदाही सोयाबीन-कापसावर भर, खत अन् बियाणांबाबत राज्य सरकराचे धोरण काय?
राज्य कृषिमंत्री दादा भुसे
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 1:44 PM

अमरावती : गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) सोयाबीनसह कापासाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे या दोन्ही पिकांना विक्रमी दर यंदा मिळाला असून आता आगामी खरिपात देखील (Soybean) सोयाबीन-कापसाचेच उत्पादन वाढणार आहे. विशेषत:अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदाच्या दराचा परिणाम क्षेत्रावर होणार असून सोयाबीन आणि कापूस बियाणांची टंचाई भासू देणार नसल्याचे आश्वासन (State Government) कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. एवढेच नाही तर खताच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून टंचाई भासू नये याकरिता सर्वतोपरी यंत्रणा कामाला लावली असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या अनुशंगाने त्यांनी अमरावती येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. दरम्यान यावेळी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम,बुलढाणा या 5 जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त तसेच पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

बोगस रोपे, रोपवाटिकेवर कारवाई

अमरावती विभागात संत्रा बागेचे क्षेत्र वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणानंतरही यामध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी निसर्गाचा अभ्यास करुनच शेती करणे हे महत्वाचे झाले आहे. असे असले तरी उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाला शासनाचे पाठबळ महत्वाचे आहे. त्यामुळे संत्राची दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना ही मिळालीच पाहिजेत. यामध्ये बोगसपणा आढळूव आल्यावर संबंधितावर कारवाईचा विचार केला जाईल. तसेच चांगल्या दर्जाचे रोप मिळवून देण्यासाठी एक समितीही गठीत केल्याचे भुसे यांनी सांगितले.

कांद्याच्या घटत्या दरावरही पर्याय

उन्हाळी हंगामातील कांद्याच्या दरात घसरण ही सुरुच आहे. घटत्या दरामुळे उत्पादनावर झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे आता नाफेडच्या माध्यमातून कांद्यासाठीही खरेदी केंद्र सुरु केली जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान दर तरी मिळेल असा त्यामागचा उद्देश आहे. तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात पावसाळ्या पूर्वी खत बियाणे कसे पोहचतील या साठी नियोजन करण्याच आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पीककर्जाचा लाभ

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. या कर्जाचा उपयोग खरीप हंगामपूर्व मशागती कामे करण्यासाठी व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत हे कर्ज वाटप करावे अशा सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी भुसे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना हे कर्ज सवलतीच्या दरात असणार आहे. शिवाय यंदा समाधानकारक पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने वेळेत पीककर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.