Jalna : उन्हाळी सोयाबीन जोमात तरीही शेतकरी कोमात, काय घडले असे जालन्यात?

उन्हाळी हंगामातील पीक पध्दतीचा बदल हा यशस्वी होताना दिसत आहे. पण जिल्ह्यातील काही भागात उत्पादन वाढीची समस्या ही कायम आहे. सोयाबीनचा पेरा होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत भोकरदन तालुक्यात सर्वकाही व्यवस्थित होते. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार याबाबत शेतकरी आशादायी असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. उन्हाळी सोयाबीन उगवलं ते बहरलंही मात्र आता अंतिम टप्प्यात फुलं आणि शेंगाच लागत नसल्याने शेतकरी धास्तवलेला आहे.

Jalna : उन्हाळी सोयाबीन जोमात तरीही शेतकरी कोमात, काय घडले असे जालन्यात?
जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन बहरले पण शेंगा न लागल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 4:13 PM

जालना :  (Summer Season) उन्हाळी हंगामातील पीक पध्दतीचा बदल हा यशस्वी होताना दिसत आहे. पण जिल्ह्यातील काही भागात उत्पादन वाढीची समस्या ही कायम आहे. (Soybean Crop) सोयाबीनचा पेरा होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत भोकरदन तालुक्यात सर्वकाही व्यवस्थित होते. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार याबाबत शेतकरी आशादायी असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. उन्हाळी सोयाबीन उगवलं ते बहरलंही मात्र आता अंतिम टप्प्यात फुलं आणि शेंगाच लागत नसल्याने शेतकरी धास्तवलेला आहे. तीन महिन्याची मेहनत आणि उत्पादनावर झालेला खर्च यापेक्षा ज्या (Seed Production) बियाणांच्या उद्देशाने पेरा केला होता त्याचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. कृषी विभगाने सोयाबीन पेऱ्याचे आवाहन तर केले मात्र, मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही अवस्था झाल्याचा आरोप आता शेतकरी करीत आहेत.

बियाणाचा उद्देश साध्य होणार की नाही

उन्हाळी हंगामात यंदा प्रथमच विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. खरिपातील सोयाबीन बियाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन कृशी विभागाने केले होते. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याचा साठा यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले. पण आता अंतिम टप्प्यात भोकरदन तालुक्यातील आव्हाना आणि परिसरातील सोयाबीनला ना फुले लागलेली आहेत ना शेंगा. त्यामुळे या बहरलेल्या पिकातून उत्पादन मिळणार की नाही अशी अवस्था सध्या झाली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही बियाणांसाठी शेतकरी भटकंती होणार का हा प्रश्न आहे. दरर्षी शेतकऱ्यांना अधिकच्या किंमतीने बियाणे खरेदी करावे लागते शिवाय यामधून फसवणूकही होते. यंदाही त्याचीच पुनारावृत्ती होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या उन्हामुळे एक दिवसआड पाणी

सोयाबीन हे पावसाळी पीक आहे. पण यंदा मुबलक पाणीसाठा आणि खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला होता. मात्र. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनला एक दिवसाआड पाणी हे द्यावेच लागत आहे. यातच विजेचा लंपडाव आणि वाढते ऊन याचा सामना करीत शेतकऱ्यांनी हे पीक जोपासले आहे. असे असूनही अंतिम टप्प्यात जर शेंगाच लागल्या नाहीत तर काय उपयोग असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. सर्वकाही सुरळीत असतानाही शेतकऱ्यांच्या समस्या मात्र कायम आहेत. त्यामुळे लागवड केलेल्या सोयाबीनचा पंचानामा करुन मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कृषी विभागाचे आवाहन पण मार्गदर्शनाचे काय?

पीक पध्दतीमधील बदलामध्ये कृषी विभागाचेही मोठे योगदान आहे. कारण कृषी विभागानेच उन्हाळी सोयाबीनचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले होते. मात्र, त्यानंतर जे मार्गदर्शन गरजेचे होते ते झालेच नाही. उन्हाळी हंगामातील सोयाबीन हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी नवीन होता. त्यामुळे मंडळानिहाय का होईना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन झाले असते तर ही समस्या उद्भवली नसती. अजून आठ दिवसांमध्ये सोयाबीन पिकामध्ये योग्य तो बदल झाला नाही तर नुकसान अटळ आहे.

संबंधित बातम्या :

PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु

Latur Market: हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय ? सोयाबीनचं मात्र शेतकऱ्यांनी मनावर घेतलं

Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.