दुष्काळात तेरावा..! पावसाच्या पाण्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन, नुकसानभरपाई मिळणार तरी कशी?
पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच पण आता सोयाबीनची मळणी करुन विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसाने भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, बाजार समितीमध्ये वेळेत वजन झाले नाही.
वाशिम : सोयाबीनची पेरणी झाल्यापासून हे पीक बाजारात आणल्यानंतरही यावर धोक्याची घंटा कायम राहिलेली आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच पण आता सोयाबीनची मळणी करुन विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसाने भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, (Washim, Market Committee) बाजार समितीमध्ये वेळेत वजन झाले नाही. त्यामुळेच सोयाबीनची राख रांगोळी झाली असून या अवस्थेतील सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांना मात्र, मोबदला देण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. असे असतानाच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरु होती. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणले असता वेळेत वजन आणि विक्री झाली नाही. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात ठेवलेले सोयाबीन हे पावसाने भिजले आहे. त्यामुळे आहे त्या परस्थितीमध्ये सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी होत आहे.
पावसाच्या पाण्यात सोयाबीनची वहीवाट
ढगाळ वातावरण असतानाही येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. दिवाळीनंतर आता कुठे सोयाबीनची आवक वाढत आहे. मात्र, बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या सोयाबनचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही. शेतीमाल हा निवाऱ्याला न ठेवता उघड्यावरच असतो. त्यामुळे पावसाने शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे. आतापर्यंत एक ना अनेक समस्यांना तोंड देत शेतकऱ्यांनी हे सोयबीन बाजार पेठेपर्यंत पोहचते केले आहे मात्र, बाजारपेठेत शेतीमाल दाखल झाला असतानाही शेतकऱ्यांचा जीव मात्र, टांगणीलाच आहे. विक्रीसाठी आणलेले सोयाबीनची पावसाच्या पाण्याने वहीवाट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोयाबीन आहे त्या परस्थितीमध्ये खरेदी करावे व बाजार समितीने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.
दर वाढल्याने वाढली होती आवक
हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे घटलेले होते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. सोयाबीनचे दर हे 6 हजार क्विंटलवर गेले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहे. यंदाच्या हंगामातील हा विक्रमी दर आहे. त्यामुळे उत्पादनावरील खर्च पदरी पडेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, वाशिमच्या बाजार समितीमध्ये अनोख्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनची खरेदी तर करावीच शिवाय बाजार सिमतीच्या प्रशासनाने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तर केली आहे. मात्र, बाजार समितीचे प्रशासक काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
ढगाळ वातावरण कायम
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच परंतू दोन दिवसांपासून पावसानेही हजेरी लावली आहे. मात्र, वाढता दर पाहता सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. पण असेच वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी कमी प्रमाणात आणावा असे अवाहन करण्यात आले आहे. परंतू, झालेल्या नुकसानभरपाईबाबत अद्यापही बाजार समितीच्या प्रशासनाने कोणतेही आश्वासन दिलेले नाही.