यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत

मंगळवारी दोन दिवसांनंतर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दाखल होताच काय दर मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पण यंदाच्या हंगामातील सर्वात कमी दर मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी 5600 वर गेलेले सोयाबीन मंगळवारी थेट 5100 वर आले होते.

यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:10 PM

लातूर : पावसाने सोयाबीन (Heavy Rain) अद्यापही पाण्यातच आहे. मात्र, भविष्यात चांगला भाव मिळतील या आशेने (Farmer) शेतकरी सोयाबीनची काढणी करीत आहे. मात्र, सोयाबीन हे (Kharif Hangam) खरीपातील मुख्य पीक यंदा घाट्यातच आहे.  मंगळवारी दोन दिवसांनंतर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दाखल होताच काय दर मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पण यंदाच्या हंगामातील सर्वात कमी दर मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी 5600 वर गेलेले सोयाबीन मंगळवारी थेट 5100 वर आले होते. त्यामुळे भविष्यात सोयाबीनची वाढणारी आवक, सोयापेंडची आवक यामुळे सोयाबीनला कवडीमोल दर मिळणार असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंत अनेत शर्तीचे प्रयत्न करुन सोयाबीन पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. तर आता बाजारपेठेत माफक दरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे. अद्यापही उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड जिल्ह्यात काढणी आणि मळणीची कामे सुरुच आहेत.

तर भविष्यात सोयाबीनची आवक ही वाढणार आहे. सध्या केवळ 8 हजार क्विंटलची आवक होऊनही दर 5 हजारापर्यंत आले असतील तर ऐन हंगामात लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 50 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. त्यादरम्यान सोयाबीनचे काय दर होणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे.

सोयाबीनची मळणी झाली की विक्री हाच पर्याय

सोयाबीन साठवणूक केली तरी भविष्यात दर वाढतील अशी चिन्हे सध्या तरी नाहीत. शिवाय पावसाने सोयाबीन भिजले असल्याने जास्त दिवस साठवणूक केली तर सडण्याची भिती आहे किंवा बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची साठवणूक न करता आहे त्या दरामध्ये विक्री करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. विक्री करावी तर पडेल त्या दरात आणि साठवणूक करावी तर नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांची व्दीधा मनस्थिती झालेली आहे.

आवक स्थिर तरीही दरात घसरण सुरुच

आवक वाढली तर दर कमी झाले हे बाजाराचे सुत्रच आहे. पण सोयाबीनचे उलट होताना दिसत आहे. सोयाबीनची दिवसाकाठी आवक ही केवळ 8 हजार क्विंटल एवढीच आहे. दोन दिवस लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे मंगळवारी आवक वाढेल असा अंदात वर्तवण्यात आला होता. पण आवक स्थिर असूनही दर 600 रुपयांनी घसरलेले आहेत

उडदाचे दरही स्थिरच

या हंगामात उडदामुळे शेतकऱ्यांने आर्थिक आधार मिळालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून बाजारात उडदाचे दर हे वाढलेले आहेत किंवा स्थिर राहिलेले आहेत. मात्र, दरामध्ये घट अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनमधून अधिकचे पैसे पदरी पडले नसले तरी उडदाने उत्पन्नात वाढ झालेली आहे. 7 हजारवरील दर आता 7200 वर गेले आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाने डागाळलेल्या उडदाची आवक झाली होती मात्र, आता दर्जेदार माल बाजारात दाखल होत असून त्याप्रमाणे दरही मिळत आहे. सोयाबीनची कसर उडदाने भरुन काढली असली तरी उडदाचे क्षेत्र कमी आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6600 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6350 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6150 रुपये क्विंटल, जानकी चना 5050 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4900, सोयाबीन 5600, चमकी मूग 7000 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (soyabean-losses-lowest-rate-of-the-season-in-laturs-agricultural-income-market-committee)

संबंधित बातम्या :

दूध उत्पादन वाढीसाठी आता गाईला कालवड अन् म्हशीला पारडीच होणार

महसूलचा मनमानी कारभार, नुकसान सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे..!

‘फळ तोडणी’ ऐवजी ‘बाग तोडण्याची’च शेतकऱ्यावर नामुष्की, लाखोंचे नुकसान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.