सोयाबीनचे दरही घटले अन् आवकही, शेतकरी वेट अँड वॅाच च्या भुमिकेत

बुधवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 5 हजार कट्ट्यांची आवक झाली आहे. दिवसाकाठी 40 हजार कट्ट्यांची आवक ही नविन सोयाबीनची काढणी झाल्यापासून होत होती ती आज कमी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. शिवाय मराठवाड्यात (Marathwada) मंगळवार सायंकाळपासून पाऊस होत असल्याचा परिणामही आवकवर झाला आहे.

सोयाबीनचे दरही घटले अन् आवकही, शेतकरी वेट अँड वॅाच च्या भुमिकेत
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 1:51 PM

लातूर : गेल्या दोन (latur) दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात तीन हजाराने घसरण झालेली आहे. (Soyabean) अपेक्षेप्रमाणे त्याचा परिणाम सोयाबीनच्या आयातीवर होता. त्याप्रमाणेच बुधवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 5 हजार कट्ट्यांची आवक झाली आहे. दिवसाकाठी 40 हजार कट्ट्यांची आवक ही नविन सोयाबीनची काढणी झाल्यापासून होत होती ती आज कमी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.

शिवाय मराठवाड्यात (Marathwada) मंगळवार सायंकाळपासून पाऊस होत असल्याचा परिणामही आवकवर झाला आहे. नविन सोयाबीन बाजार पेठेत दाखल होताच सोयाबीनला 8 हजार ते 8 हजार 500 असा दर मिळाला होता. त्यामुळे बाजार पेठेतील सोयाबीनची आवकही वाढली होती. शनिवारी आणि सोमवारी दिवसाकाठी येथील बाजार समितीमध्ये 40 हजार सोयाबीनचे कट्टे दाखल होत होते. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने आवक वाढणार असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत असतानाच सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम आता आवकवर होत आहे.

असे असले तरी गेल्या दोन दिवसापासून सोयाबीनला 6 हजाराचा भाव मिळत आहे. हे दर स्थिर आहेत यातच शेतकरी समाधानी आहे. बुधवारी केवळ लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विक्रीसाठी आणले होते. मंगळवारी 5600 एवढा दर मिळाला होता तर आज 6200 दर मिळाला आहे. तर दुसरीकडे खरीपातील दुसरे पिक उडीद याने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. दिवसेंदिवस उडदाच्या दरात वाढ होत आहे. पावसामुळे उडीद हे डागाळलेले असले तरी चांगला दर मिळत आहे. मंगळवारी उडीद हे 7100 रुपये क्विंटल होते तर आज उडदाचे दर हे 7400 वर गेला होता.

सोयाबीनचे 5 हजार कट्टेच बाजार समितीमध्ये दाखल

सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत होती मात्र, दर घटत असल्याने आवक ही कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 40 ते 45 हजार कट्टे सोयाबीन हे लातूर, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक, सोलापूर या भागातून दाखल होत होते. कमी होत असलेल्या दराची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली असून सध्या सोयाबीनची साठवणूक केल्याचे फायद्याचे म्हणत बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. शनिवारपर्यंत सोयाबीनची आवक ही वाढलेली होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण झाल्याने आता कमी झाली आहे. बुधवारी केवळ 5 हजार कट्टे लातूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले होते. बुधवारी सोयाबीनला सरासरी 6200 क्विंटल प्रमाणे दर मिळालेला होता.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6450 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6550 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6361 रुपये क्विंटल, जानकी चना 5075 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 6600, चमकी मूग 6550, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7421 एवढा राहिला होता. (soyabean-prices-also-fall-as-arrivals-fall-latur-market-rates-fall)

संबंधित बातम्या :

मुदत अंतिम टप्प्यात तरीही ई-पीक पाहणीचा सावळा गोंधळ सुरुच

चिकनपेक्षा मेथी महाग, नागपूरमध्ये भाज्यांचे दर शंभरीपार, मुंबई पुण्यातही भाजापीला महागला; खायचं काय बटाटे?

सोयाबीनचे दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.