सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. तर दुसरीकडे आवक कमी असतानाही ही परस्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितामध्ये आवकही वाढली आणि 100 रुपयांनी दरातही वाढ झाली आहे.

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:53 PM

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. तर दुसरीकडे आवक कमी असतानाही ही परस्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितामध्ये आवकही वाढली आणि 100 रुपयांनी दरातही वाढ झाली आहे. आता सोयाबीन साठ्यावर सरकारची मर्यादा राहणार नाही. यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक हे सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. तीन दिवसांपासून या बाजार समितीमध्ये 6 हजार 450 वरच दर ठप्प होते.

सोयाबीन दराबाबत सर्वकाही पोषक वातावरण आहे. आवक कमी-जास्तीचाही परिणाम आता किंमतीवर होत नाही. मागणीपेक्षा पुरवठा हा कमी असल्याने दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपायांची वाढ होत आहे. दिवाळीनंतर सुरु झालेला बदल आतापर्यंत तर कायम आहे. भविष्यातही सोयाबीनचा दर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रक्रिया उद्योजक सक्रिय

लातूरमध्ये सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. दाळमीलचे जाळे आहे. आता पर्यंत सोयाबीनच्या साठवणुकीवर मर्यादा ठरवून देण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजक हे कारवाईच्या भितीने साठवणुक करुन ठेवत नव्हते. पण आता हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सोयाबीनला मागणी वाढली आहे. शिवाय आता सोयापेंडच्या आयातीचा निर्णयही रखडला असल्याने सोयाबीन शिवाय पर्यायच उरलेला नाही. सोयाबीनची मागणी वाढली असली तरी पाहिजे त्या प्रमाणात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली नाही.

अजूनही दर वाढीचे संकेत

सोयाबीनची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे शेतकरी हे गरजेनुसारच विक्री करीत आहेत. दरवर्षी या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची आवक होत असते. यंदा मात्र, हंगाम सुरु झाल्यापासून एकदाही अशाप्रकारे आवक ही झालेली नाही. शेतकऱ्यांना अजूनही दर वाढीची अपेक्षा आहे आणि वाढती मागणी पाहता सोयाबीनचे दर वाढणार असल्याचे व्यापारीही सांगत आहेत. शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे पण ते गरजेप्रमाणेच विक्री करीत आहेत. हेच दरवाढीचे सर्वात महत्वाचे कारणही असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6260 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6261 रुपये क्विंटल, जानकी चना 4916 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7100, चमकी मूग 7300, मिल मूग 6350 तर उडीदाचा दर 7370 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको

E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड…!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.