शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनची आवक वाढली दर घटले, बाजारपेठेत चिंतेचे ढग

मध्यंतरी स्थिर असलेले दर आता दिवसागणिस घसरत आहेत. शिवाय आवक वाढत असल्याने दरात घसरण ही कायम राहणार का असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. पण पडत्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा कायम आहे. गुरुवारी तर 5000 हजार रुपये प्रतिक्विंटला दर मिळालेला आहे. या हंगामात सर्वात कमी दराची नोंद आज झाली आहे.

शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनची आवक वाढली दर घटले, बाजारपेठेत चिंतेचे ढग
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 5:20 PM

लातूर : एकीकडे (Central Govrnment) सरकार खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न करुन पाहत आहे. मात्र, दर घसरत आहेत ते (Soyabean) सोयाबीनचे. मध्यंतरी स्थिर असलेले दर आता दिवसागणिस घसरत आहेत. शिवाय आवक वाढत असल्याने दरात घसरण ही कायम राहणार का असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. पण पडत्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा कायम आहे. गुरुवारी तर 5000 हजार रुपये प्रतिक्विंटला दर मिळालेला आहे. या हंगामात सर्वात कमी दराची नोंद आज झाली आहे.

सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक आहे. मराठवाड्यात याचा पेरा वाढतच आहे. शिवाय गेल्या काही वर्षांपासून चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढलेले आहे. त्यामुळे कापूस, तूर या पीकांचे क्षेत्र घटले पण सोयाबीनचे क्षेत्र हे वाढलेले आहे. यंदा तर राज्यात 52 लाख हेक्टरावर पेरा झाला होता. मात्र, पावसाने पीकाचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम आता दरावरही होत आहे. पावसामुळे काढणीची कामे रखडली आणि आता दर कमी झाले आहेत. लातूरच्या कृषी उत्पान्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 9 हजार क्विंटलची आवक झाली होती तर पोटलीत दर हा 5 हजाराचा मिळाला होता. आता सोयाबीन काढणीच्या कामांना वेग आला असून आवक ही वाढणारच आहे. पण दर असेच घसरत राहिले तर मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

काढणीचा खर्चही निघेणा

सोयाबीन हे पावसात भिजलेले आहे. आता काढणीची कामे सुरु असली तरी हे पीक चिखलात आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीला एकरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. शिवाय पेरणीपासून केलेला खर्च हा वेगळाच. दरवर्षी सोयाबीन म्हणलं की उत्पादन नक्की असे चित्र झाले होते. यंदा मात्र, पावसानेही नुकसान केले आहे. शिवाय बाजारातही योग्य दर मिळत नाही. आता आवक वाढली की दर घसरणार यामुळे काही शेतकरी हे साठवणूकीवर भर देत आहेत.

यंदा उत्पादनही कमी

मराठवाड्यात एकरी 8 ते 10 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होतेय त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. यंदाही भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, पावसामुळे पूर्ण खऱीपाचाच नाश झालेला आहे. सोयाबीनला वावरातच कोंभ फुटले आहेत. तर एकरी 3 ते 4 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. तर दुसरीकडे काढणीसाठी एकरी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

भविष्यात अणखीन दर घटण्याची शक्यता

सध्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत आहे. अजूनही सोयाबीनची काढणी- मळणी ही कामे सुरुच आहेत. भविष्यात आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावर होणार आहे. आयात केलेली सोयापेंड ही आगामी महिन्यात देशात दाखल होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण राहणार असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी आहे त्या दरात विक्री करावी अन्यथा जानेवारीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी काढावे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6260 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6326 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4930 रुपये क्विंटल, विजय चणा 5073, चना मिल 4800, सोयाबीन 5526, चमकी मूग 7100, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7241एवढा राहिला होता. (Soyabean prices continue to fall, rates fall in Latur market as arrivals rise)

संबंधित बातम्या :

मंदिरे उघडली बाजार ‘फुलला’, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला

खरीप पीकांची मळणी सुरुयं..मग ही खबरदारी आवश्य घ्या…!

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.