Latur : सोयाबीनची पुन्हा हुलकावणी, हंगामाच्या तोंडावर खरीप पिकातूनच निराशा, पहा शेतीमालाचे दर

खरिपासह नव्याने रब्बी हंगामातील शेतीमाल बाजारात दाखल होत असताना दरात मात्र, कमालीची घट होत आहे. सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. शिवाय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि हरभऱ्याची मोठी आवक असते. सबंध हंगामात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे तर हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नाही.

Latur : सोयाबीनची पुन्हा हुलकावणी, हंगामाच्या तोंडावर खरीप पिकातूनच निराशा, पहा शेतीमालाचे दर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:47 PM

लातूर : गतआठवड्यात (Soybean Rate) सोयाबीन दरात सुधारणा अन् आता पुन्हा घट यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चक्रावून गेले आहेत. साठवलेल्या सोयाबीनची विक्री असा विचार सुरु असतानाच पुन्हा उतरती कळा लागली आहे. त्यामुळे सोयाबीन दराचे देखील कांद्याप्रमाणेच रात्रीतून बदल होत आहे. (Kharif Season) खरीप हंगामामुळे बाजारपेठेत शेतीमालाची आवक वाढत आहे. सोयाबीनची आवक वाढल्यामुळेच दरात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 6 हजार 700 असलेले सोयाबीन आता 6 हजार 500 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना घटत्या दराने मात्र कोंडी केली आहे. दुसरीकडे तूर आणि हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. बाजारपेठेत हरभरा, तूर आणि सोयाबीनचीच आवक अधिक आहे. मात्र, शेतीमालाच्या दरात घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शेतीमालाच्या दरात घट, उत्पादनावर अधिकचा खर्च

खरिपासह नव्याने रब्बी हंगामातील शेतीमाल बाजारात दाखल होत असताना दरात मात्र, कमालीची घट होत आहे. सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. शिवाय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि हरभऱ्याची मोठी आवक असते. सबंध हंगामात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे तर हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नाही. मुख्य पिकांच्या दरात घट होत असताना दुसरी शेती मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंतचा खर्च वाढलेलेा आहे. त्यामुळे दुप्पट उत्पादन तर सोडाच पण जेवढे गाढले तेवढेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही.

असे आहेत शेतीमालाचे दर

सध्या बाजारात साठवलेले खरिपातील आणि उन्हाळी सोयाबीन दाखल होत आहे. सोयाबीनला 6 हजार 500 पर्यंतचा दर मिळत आहे. तर लाल तूर 6 हजार 100, पांढरी तूर 6 हजार 10 रुपये, हरभरा 4 हजार 500, चमकी मूग- 6 हजार 400, मिल मूग- 5 हजार 800 उडदाला 6 हजार 300 असा दर मिळत आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून अधिकच्या खर्चामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

उन्हाळी सोयाबीन थप्पीलाच

यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला होता. पोषक वातावरण पण अंतिम टप्प्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. असे असले तरी खरिपाप्रमाणे सोयाबीनला उतार पडला होता. त्यामुळे उत्पादन समाधानकारक असले तरी सध्याचे दर असमाधानकारक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दराची प्रतीक्षा आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.