ठरलं तर मग, दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री नाही, आवक निम्म्याने घटली

गुरुवारच्या आवकवरुन शेतकऱ्यांनी आता दर वाढल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच करायची नाही का असा निर्धार केल्याचे दिसून आले आहे. कारण ज्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारपर्यंत 35 ते 40 हजार पोत्यांची आवक होत होती त्याच बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) केवळ 20 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

ठरलं तर मग, दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री नाही, आवक निम्म्याने घटली
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 3:11 PM

लातूर : सोयाबीनची आवक कमी होऊनही दरावर काही फरक पडत नाही. तर गेल्या काही दिवसांपासून नविन सोयाबीनची आवक वाढली असतानाही दर हे स्थिरच होते. महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात वाढ तर सोडाच पण आहे ते दरही स्थिर राहत नाहीत. (Soyabean Rate) त्यामुळे गुरुवारच्या आवकवरुन शेतकऱ्यांनी आता दर वाढल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच करायची नाही का असा निर्धार केल्याचे दिसून आले आहे. (Arrivals decrease Soyabean) कारण ज्या (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारपर्यंत 35 ते 40 हजार पोत्यांची आवक होत होती त्याच बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) केवळ 20 हजार पोत्यांची आवक झाली आहे. विशेष: म्हणजे दिवाळी सण तोंडावर असताना लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात चढ नाही पण कायम उतार राहिलेला आहे. मात्र, किमान 6 हजाराचा दर मिळेल अशी अपेक्षा ही शेतकऱ्यांना होती पण दर वाढीचे चिन्ह नसल्याने आता शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला असल्याचे चित्र आहे. गुरुवारी कमी आवक झाल्याने 100 दराची सुधारणा झाली आहे पण ही काय वाढ म्हणता येत नसल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दर वाढत नाही तोपर्यंत सोयाबीनची विक्री होते का नाही हे पहावे लागणार आहे.

केवळ वीस हजार पोत्यांची आवक

दरवर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर, बीड, उस्मानाबाद तसेच कर्नाटक राज्यातून सोयाबीनची आवक होत असते. काही शेतकरी तर थेट तेल कंपन्यांना सोयाबीनची विक्री करतात. यंदा मात्र, चित्र उलटे आहे. रब्बी हंगाम, दिवाळी असतानाही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीवर नाही तर साठवणूकीवर भर दिलेला आहे. दिवसेंदिवस आवक वाढत असताना गुरुवारी केवळ 20 हजार पोत्यांचीच आवक झाली आहे. बुधवारी अचानक दरात 200 रुपयांची घसरण झाल्याचाही परिणाम आज पाहवयास मिळाला आहे.

कृषीतज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांच्या पचनी

सध्याचे सोयाबीनचे दर हे काही कायम राहणारे नाहीत. पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याची भावना व्यापाऱ्यांची तर झालीच आहे शिवाय सरकरच्या धोरणाचा परिणामही थेट दरावर होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दराचे चित्र हे दिवाळीनंतर आणि सोयापेंडची आयात झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खऱाब सोयाबीनची विक्री करावी मात्र, चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवूक केली तर फायद्याचे राहणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळेही आवकवर त्याचा परिणाम झाला असेल.

उडदाचे दर मात्र स्थिरच

हंगामाच्या सुरवातीपासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. उडदाला 7 हजार ते 7 हजार 400 पर्यंत दर मिळालेला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना उडीद या पिकानेच खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. सध्या उडदाला 7 हजार 200 चा दर आहे. मात्र, त्याची आवक ही कमी झाली आहे. उडदाची काढणी ही ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच झाली होती त्यामुळे आता आवक जास्त नसली तरी दर मात्र कायम आहेत. हमीभावापेक्षा यंदा उडदाला दर हे चांगले राहिलेले आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6125 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4900, सोयाबीन 5525, चमकी मूग 7100, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Soyabean prices fall, arrivals to Latur’s Agricultural Income Market Committee decline)

संबंधित बातम्या :

रेशीम उद्याोगात आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यात आता कोष खरेदी बाजारपेठ, शेतकऱ्यांना करावी लागणार ‘ही’ प्रक्रीया !

पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ अन् रोगराईलाही प्रतिबंध

यशोगाथा : खडकावर बहरलीय सिताफळीची बाग अन् उत्पन्न मिळतंय लाखात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.