Positive News: शेतकऱ्यांच्या मनात तेच होणार का बाजारात ? सोयाबीनच्या दराबाबत आशादायी चित्र
दिवसागणिस सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. दिवाळीनंतर मात्र, काहीप्रमाणात का होईना हे दर स्थिर झाले आहेत. मात्र, ज्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती तेच आता प्रत्यक्षात होणार का ? असे शुक्रवारच्या सोयाबीनच्या दरावरुन वाटत आहे. कारण सोयाबीनला 5 हजार 500 चा दर मिळाला असून पोटलीतला दर हा 5300 चा आहे.
लातूर : दिवसागणिस सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. दिवाळीनंतर मात्र, काहीप्रमाणात का होईना हे दर स्थिर झाले आहेत. मात्र, ज्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती तेच आता प्रत्यक्षात होणार का ? असे शुक्रवारच्या सोयाबीनच्या दरावरुन वाटत आहे. कारण (Soybean prices increased) सोयाबीनला 5 हजार 500 चा दर मिळाला असून पोटलीतला दर हा 5300 चा आहे. त्यामुळे शुक्रवारी आशादायी चित्र निर्माण झाले होते. (Latur) सोयाबीनच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर शेतकऱ्यांनी केलेल्या साठवणूकीचा फायदा होणार आहे. मात्र, दिवाळी नंतर बाजारपेठेतले चित्र हे बदलत असून सोयाबीनचे दर केवळ स्थिरच नाही तर त्यामध्ये आता वाढ होऊ लागली आहे. ही बाब सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा देणारी आहे.
यंदा केवळ मुहूर्ताच्या सोयाबीनला 11 हजाराचा दर मिळाला होता. त्यानंतर सोयाबीनच्या दरात कायम घसरण होत होती. अखेर आज (शुक्रवारी) पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 11 हजार क्विंटल सोयाबीनची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली होती.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा
हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला भाव नव्हता. मात्र, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली तर इतरांनी साठवणूकीवरच भर दिला होता. किमान दिवाळीनंतर करी सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पण आता ते प्रत्यक्षात होताना पाहवयास मिळत आहे. कारण शुक्रवारी सोयाबीनला 5500 चा दर मिळाला आहे. त्यामुळे आता सोयाबीनची आवक वाढणार का हे पहावे लागणार आहे.
पाच दिवसांपासून अशी झाली दरात वाढ
दिवाळीच्या निमित्ताने मध्यंतरी आठ दिवस लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांनी बाजार खुले केले त्या दिवशी सोयाबीनला 5300 चा दर मिळाला होता. तर त्यानंतर मात्र दरात सुधारणा होत गेली असून शुक्रवारी 5500 दर मिळाला आहे. शिवाय गेल्या पाच दिवसांमध्ये एकदाही दर हे कमी झालेले नाहीत. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढीला आणि ते टिकून राहण्यास पोषक वातावरण झाले आहे का ? याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
11 हजार क्विंटलची आवक
दरवर्षी हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 50 हजार क्विंटल सोयाबीनची आवक ही दिवसाकाठी होत असते. यंदा मात्र, दर घटल्याने आवकही कमी झाली होती. शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. त्यामुळे शुक्रवारी दर वाढूनही केवळ 11 हजार क्विंटलची आवक झाली होती. आता सुधारलेले दर पाहून आवक वाढते का हे पहावे लागणार आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5971 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 5050 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4800, सोयाबीन 5511, चमकी मूग 7100, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7281 एवढा राहिला होता.
संबंधित बातम्या :
सोयबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर
ढगाळ वातावरणाचा ‘या’ तीन मुख्य पिकांना धोका, काय आहे उपाययोजना ?
ऊस गाळपासाठी ऑनलाईन अर्ज, मात्र, एफआरपी थकबाकीदारांच्या वाटेला कारवाईचा बडगा