सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय

दिवाळी सणामुळे जवळपास सर्वच लहान-मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत. अशातच सोयाबीनचे दर हे गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. कधी नव्हे ते या हंगामात सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. ऐन सणामध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दर सुधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, बाजार समित्या ह्या बंद असल्याने शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न कायम आहे.

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 1:14 PM

लातूर : दिवाळी सणामुळे जवळपास सर्वच लहान-मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत.  ( Soyabean Rate,) अशातच सोयाबीनचे दर हे गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. कधी नव्हे ते या हंगामात सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. ऐन सणामध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दर सुधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, (Bazar Simitee) बाजार समित्या ह्या बंद असल्याने शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न कायम आहे. पण ज्या ठिकाणी शेतकरी केंद्र किवां तेल प्रक्रिया उद्योग सुरु आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री शक्य आहे. मात्र, यंदाच्या हंगामात दर वाढले तर विक्रीसाठी मोकळीक नाही अशी अवस्था सोयाबीनची आहे.

गतआठवड्यात सोयाबीनचे दर हे 5 हजारापेक्षाही कमी झाले होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. परिणमी उडदाची आवक ही वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या दिवाळी सणामुळे बंद आहेत. तर सोयाबीनला 5 हजार 300 चा दर मिळत आहे. हाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बाजार समित्या बंद होण्यापूर्वी विक्रमी आवक

दिवाळीमुळे राज्यातील बाजार समित्या ह्या काही दिवस बंद राहतात. नाशिक बाजारपेठ ही सलग 10 दिवस बंद राहणार असल्याचे सुरवातीच्या काळात सांगण्यात आले होते. त्याचा परिणाम हा इतर बाजार समित्यांवर झाला होता. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 50 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दर हा सरासरी 5 हजार रुपये मिळाला होता.

मागणी वाढल्याने दरात वाढ

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शिवाय डाळीसाठ्यावरील निर्बंधाची मर्यादा ही संपलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग कारखान्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरु आहे. शिवाय सध्या सणामुळे तेलाच्या मागणीत वाढ झाल्यानेही दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे. सोयाबीनचे दर हे स्थिरच नाही तर सुधारत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचालवलेल्या आहेत. हेच दर कायम राहण्याची आशा शेतरकरी बाळगत आहेत.

शुक्रवारपासून लातूर बाजार समिती होणार सुरु

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होणार आहे. मात्र, पाच दिवस बंद राहणारी बाजार समिती आता चक्क 10 दिवस बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. शुक्रवारी केवळ पाडव्याचे मुहूर्त म्हणून बाजार समिती ही सुरु राहणार आहे. तर पुन्हा शनिवारी व्यवहार हे बंद राहणार असून सोमवारपासून नियमित बाजार समिती ही सुरु राहणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनची विक्री करायची झाली तर शेतकऱ्यांना तेल विक्री प्लांटस् चा आधार घ्यावा लागणार आहे. (Soyabean prices stable, farmers have these options for sale)

संबंधित बातम्या :

किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात, संघर्ष दिंडीनंतर आता महामुक्काम

रब्बीचा ‘श्रीगणेशा’ केलाय, मग ‘ही’ काळजी घेतली तरच होईल पीकांचे उगवण..

पशुखाद्याच्या दरात वाढ, दूध दर घटल्याने शेतीचा मुख्य जोडव्यवसाय अडचणीत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.