Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत

दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. यातच पुन्हा (Soypend imports) सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत ही वाढवून मार्च 2022 करावी अशी मागणीच (Union Animal Husbandry Minister) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी विदेशी महासंचालकांकडे केली आहे.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 11:24 AM

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट होत आहे. दिवाळीनंतर तब्बल दीड हजार रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. शिवाय ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. यातच पुन्हा (Soypend imports) सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत ही वाढवून मार्च 2022 करावी अशी मागणीच (Union Animal Husbandry Minister) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी विदेशी महासंचालकांकडे केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात अणखीन घट होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कधी नव्हे ते यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येण्यास सुरवात झाली होती. खरीपाच्या सुरवातीपासून सुरु असलेली संकटाची मालिका आता तरी संपेन असे चित्र निर्माण झाले होते. कारण सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत होती. मात्र, दोन दिवसांपासून सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले आहेत.

उर्वरीत सोयापेंडचीही होणार आयात

ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्यात आली होती. तब्बल 12 लाख टन सोयापेंड हे आयात केले जाणार होते. मात्र, पहिल्या टप्प्यात 6 लाख 50 हजार टनच सोयापेंड आयात झाले होते. असे असताना त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला होता. व्यापारी, प्रक्रिया उद्याोजक यांना सोयापेंडचा पर्याय उपलब्ध झाल्याने सोयाबीन हे थेट 4 हजार 500 वर येऊन ठेपले होते. पण घटती आवक सोयापेंडचा साठा अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचे दर हे वाढत गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला 6 हजार 800 चा दर होता. मात्र, दर घटत असतानाच पुन्हा उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंड आयातीच्या चर्चेचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे.

अखेर पोल्ट्री ब्रीडर्सच्या मागण्यांकडेच पशूसंवर्धन मंत्र्याचे लक्ष

मध्यंतरी पोल्ट्री ब्रीडर्सचे अध्यक्ष बहादूर अली यांनी सोयाबीनचे दर वाढताच सोयापेंडची आयात करुन हे दर नियंत्रणात ठेवण्याबाबत पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे पत्र लिहून केली होती. मात्र, त्यानंतर शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी याचा तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सोयापेंडच्या आयातीला परवानगीच दिली जाणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण आता पुन्हा पशूसंवर्धन मंत्री यांनी थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. आता सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागली का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

केंद्रीय स्तरावरील हलचालीचा परिणाम थेट बाजारपेठेतील दरावर

सोयाबीन हे जागतिक स्तरावरील मुख्य पीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा थेट परिणाम येथील बाजार समितीवर देखील होतो. आता गेल्या दोन दिवसांमध्ये दरात जी घट होत आहे ती शेतकऱ्यांच्या लक्षात न येण्यासारखी आहे. कारण कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे दर घटले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यातच आता केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोयापेंडच्या आयातीच्या अनुशंगाने लिहलेल्या पत्राचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. सोयाबीनचे दर हे आता 6 हजारावर येऊन ठेपले आहेत.

संबंधित बातम्या :

ऊसाच्या पाचटाचे राजकारण : बिलात 5 टक्के कपात होत असल्याने शेतकरी मागणार न्यायालयात दाद

गंधकाच्या वापरामुळे पिके बहरात अन् उत्पादनातही वाढ, पहा काय आहेत फायदे ?

शेतीमालाच्या निर्यातीची प्रक्रिया नेमके असते तरी कशी? प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.