Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…
चालू आठवड्यात सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे होत आहे. एकीकडे कापसाच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर हे स्थिरावले आहेत. केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हीताचे नाहीत तर उलट दर कमी होण्यासाठीचे पोषक होते. मात्र, असे असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे.
लातूर : चालू आठवड्यात सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे होत आहे. एकीकडे कापसाच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे (Soybean Prices) सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर हे स्थिरावले आहेत. (Central GOvernment) केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हीताचे नाहीत तर उलट दर कमी होण्यासाठीचे पोषक होते. मात्र, असे असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. एवढेच नाही तर (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढूनही दर हे स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक वेगळेच समाधान आहे. सोयाबीनला 6 हजार 400 रुपये दर मिळत असून कापसाच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या कापसाला 9 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.
दरातील चढ-उतारामुळे शेतकरी चिंतेत
गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती. शिवाय केंद्र सरकारने एकापाठोपाठ तीन असे निर्णय घेतले ज्यामुळे दरात अणखीनच घट होईन असे वातावरण झाले आहे. यामध्ये वायदे बंदी, सोयापेंड साठवणूकीवर मर्यादा यासारख्या निर्णयाचा समावेश होता. पण या निर्णयाचा थेट बाजारातील दरावर परिणाम झालेला नाही. पुन्हा सोयाबीनच्या मागणीत वाढ झाल्याने टप्प्याटप्प्याने का होईना दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने आता आवकही वाढत आहे.
आवक वाढली अन् दरातही वाढ
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत 12 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक ही झालेलीच नाही. दिवाळीपूर्वी दर 4 हजार 500 रुपये होते. त्या दरम्यान, आवक केवळ 6 ते 7 हजार पोत्यांची होती. मात्र,दिवाळीनंतर दर वाढल्याने ही आवक 10 हजार पोत्यांवर गेली होती. आता दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. शिवाय आवकही 15 हजार पोत्यांची होत असताना बुधवारी सोयाबीनला 6 हजार 400 रुपये दर मिळाला आहे. वाढत्या दरामुळे आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहे.
कृषीतज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
सध्या सोयाबीन आणि कापसाच्या दरात वाढ होत असल्याने लागलीच आवक मोठ्या प्रमाणात झाली तर पुन्हा दर कमी होऊ शततात. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने या दोन्ही पिकांची विक्री हीच फायद्याची राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीन आणि कापसाच्या दरात वाढ होत आहे. कापसाच्या दरातील वाढ ही शाश्वत असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आता काही क्षेत्रावरील सोयाबीन हे फुलोऱ्यात आहे. त्यामुळे ते बाजारपेठेत येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन विकणे गरजेचे आहे.