Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News : सोयाबीनच्या दरात अन् आवकमध्येही वाढ, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?

हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात खरिपातील महत्वाची असलेले सोयाबीन आणि कापसाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत केवळ नुकसानच झाले होते पण या दोन्ही पिकांच्या दरात चांगलीच सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Positive News : सोयाबीनच्या दरात अन् आवकमध्येही वाढ, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दर स्थिर आहेत.
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 4:11 PM

लातूर : हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात खरिपातील महत्वाची असलेले सोयाबीन आणि कापसाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत केवळ नुकसानच झाले होते पण या दोन्ही पिकांच्या दरात चांगलीच सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरातील चढ-उतारामुळे महत्वाची समजली जाणारी (Latur Market) लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती देखील अनेक वेळा ओस पडलेली आहे. (Soybean arrivals) दिवसाकाठी 40 ते 50 आवक असताना केवळ 8 ते 10 पोत्यांची आवक या बाजारपेठेत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून बदल झाला असून 20 ते 25 हजार पोत्यांची आवक सुरु आहे तर सोयाबीनचे दरही स्थिरावले आहेत. सोयाबीन 6 हजार 350 रुपये तर कापसाला 9 हजार 500 रुपये असा विक्रमी दर मिळत आहे.

दर स्थिरावले तरी शेतकऱ्यांची समयसुचकता महत्वाची

नवीन वर्षात सोयाबीनचे दर सुधारलेच नाही तर ते स्थिरही झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. लातूर बाजारपेठेत आवक दुपटीने वाढलेली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी केलेल्या साठवणूकीचा अखेर फायदा झाला आहे. मात्र, दर वाढले असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्यानेच करणे फायदेशीर राहणार आहे. यामुळे दर तर टिकून राहतीलच पण भविष्यात दरात वाढ झाली तर त्याचा देखील फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत ज्या पध्दतीचा अवलंब केला तीच पध्दत कायम ठेवणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

हमी भावाप्रमाणेच तूरीला बाजारपेठेत दर

हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा अधिक झाले नाहीत. व्यापाऱ्यांनी मनमानी करीत तुरीचे दर ठरवले होते. आता 1 जानेवारीपासून राज्यात तूर हमीभाव केंद्र सुरु झाली आहेत. या केंद्रांना सुरवात होताच बाजारपेठेतील दरही वाढलेले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. तर आता बाजारपेठेतही 6 हजार प्रमाणेच दर मिळत आहे. आता तुरीचा हंगाम सुरु झाला असून खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. तर ग्रामीण भागातील खरेदी केंद्र अद्यापही सुरुच झालेली नाहीत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6300 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5841 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4818 रुपये क्विंटल, विजय चणा 4750, चना मिल 4800, सोयाबीन 6491, चमकी मूग 6800, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7000 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

PM KISAN : देशभरातील 60 लाख 30 हजार शेतकरी 10 व्या हप्त्यापासून वंचितच, जबाबदारी कुणाची ?

Rabi Season: मुबलक पाणी असतनाही रब्बी पिके धोक्यात, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय

‘पीएम किसान’चा हप्ता बॅंकेत जमा पण शेतकऱ्यांच्या खिशात नाही, नेमकी अडचण काय? वाचा सविस्तर

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.