सोयबीनचे दर स्थिर, शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ..!
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अद्यापपर्यंत पोल्ट्री ब्रीडर्सच्या पत्रावर सरकार हे गांभीर्यांने विचार करीत नाही. शिवाय मागणीच्या तुलनेत सोयाबीनचा पुरवठा हा कमीच आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरामध्ये वाढत होणार आहे.
लातूर : सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. पण मध्यंतरी पोल्ट्री ब्रीडर्सने घेतलेल्या भूमिकेचा परिणाम (Soybean Prices) सोयाबीनच्या दरावर होणार का याची धास्ती ही होतीच. यातच गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न (Farmers) शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अद्यापपर्यंत पोल्ट्री ब्रीडर्सच्या पत्रावर सरकार हे गांभीर्यांने विचार करीत नाही. शिवाय मागणीच्या तुलनेत सोयाबीनचा पुरवठा हा कमीच आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरामध्ये वाढत होणार आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणूकीरच भर देणे गरजेचे असल्याचे ( Advice to Farmers) मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम वाढ होत राहिलेली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोयबीन हे 5900 रुपयांवर ठप्प आहे. शुक्रवारी 20 हजार पोत्यांची तर आज (शनिवारी) केवळ 14 हजार पोत्यांची आवक झाली आहे. त्यामुळे दर स्थिर असतनाही शेतकरी सोयाबीन साठवणूकीवरच भर देत आहेत.
वाढते दर अखेर 5900 वर स्थिरावले
दिवाळीनंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये कायम वाढ राहिलेली होती. दिवसाकाठी 150 रुपयांनी वाढ होत होती. मात्र, शनिवारी 5900 वरच दर स्थिरावले होते. दराची चिंता न करता शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला असल्याचे शनिवारी झालेल्या आवकवरुन समोर आले आहे. शनिवारी केवळ 14 हजार पोत्यांचीच आवक झाली होती. त्यामुळे दर वाढली की आवक वाढणार या सुत्राला शेतकऱ्यांनी छेद दिला आहे. त्यामुळे मनातला दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री नाही असाच निर्धार शेतकऱ्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
दराबाबात व्यापाऱ्यांचे काय आहे मत
पोल्ट्री ब्रीडर्स यांनी सोयापेंडच्या आयातीची मागणी केली असली तरी त्याचा परिणाम सोयाबीनच्या बाजार भावावर झालेला नाही. सध्या प्रक्रिया उद्योजक हे सोयाबीन खरेदीला पसंती देत आहेत. शिवाय मागणीपेक्षा पुरवठा हा कमीच आहे. त्यामुळे सोयबीनला भविष्यात 6 हजार 500 ते 7 हजाराचा दर मिळेल असा अंदाज व्यापारी अशोक आग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच शेतकरी अजूनही सोयाबीन विक्रीची गडबड करीत नाही. शिवाय 7 हजाराचा दर होत असलेल्या आवकवरुन अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी केवळ योग्यारित्या सोयाबीनची साठवणूक करणे गरजेचे आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6000 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5900 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5700 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 6350, चमकी मूग 7300, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7250 एवढा राहिला होता.
संबंधित बातम्या :
कृषी विभागाचा अंदाज खरा ठरला, पण शेतकऱ्यांना मिळणार का उत्पादकता?
काय सांगता ? कांद्यालाही ‘देशी दारुचा’ डोस, रोगांपासून बचावासाठी शेतकऱ्यांची शक्कल
नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीचा ‘तडका’, यंदा होणार विक्रमी आवक