Latur Market : सोयाबीनच्या दरात चढ-उतार, शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेलीच, शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

आठवड्याभरात सोयाबीन 6 हजार 500 च्या पुढे गेले नाही तर 6 हजाराच्या खाली आले नाही. मात्र, सध्याचे दर हे शाश्वत वाटतच नसल्याने शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हा प्रश्न कायम आहे. आठवड्यातील उच्चांकी दर हा शनिवारी 6 हजार 450 रुपये मिळाला होता. गत आठवड्यातही असेच चित्र होते. मात्र, आता सोमवारी काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे

Latur Market : सोयाबीनच्या दरात चढ-उतार, शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेलीच, शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 4:28 PM

लातूर : आठवडाभर सोयाबीनच्या (Soybean prices) दरात चढ-उतारच झालेला आहे.  (price fluctuations) सोयबीनचे दर हे स्थिरावतच नसल्याने नेंमके काय करावे असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात कायम घर करुन आहे. आठवड्याभरात सोयाबीन 6 हजार 500 च्या पुढे गेले नाही तर 6 हजाराच्या खाली आले नाही. मात्र, सध्याचे दर हे शाश्वत वाटतच नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हा प्रश्न कायम आहे. आठवड्यातील उच्चांकी दर हा शनिवारी 6 हजार 450 रुपये मिळाला होता. गत आठवड्यातही असेच चित्र होते. मात्र, आता सोमवारी काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या निर्णयाचाच परिणाम दरावर होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

शेतकरी अजूनही आशादायीच..

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर वाढतीलच ही आशा कायम राहिलेली आहे. त्यानुसार दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढही झाली. 4 हजार 500 वरील दर हे 6 हजार 500 येऊन ठेपले होते. त्या दरम्यान, बाजारपेठेत मागणीही होती. मात्र, शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर हे 10 हजारावरील जातील ही आशा होती. दरम्यानच, सोयापेंडची आयात, सोयाबीनसह इतर 8 शेतीमालावरील वायदे बंदीचा निर्णय याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. सोयापेंडच्या आयातीचा निर्णय झाला नसला तरी त्या दरम्यानच्या अस्थिरतेमुळे अजूनही सोयाबीनचे दर हे सुधारलेले नाहीत.

सोयापेंड साठवणूकीवर मर्यादा

सोयाबीन साठामर्यादेवर शेतकरी तयार नसल्याने आता सोयापेंडच्या साठ्यावर मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचे सोयापेंड हे साठवणूक करता येणार नाही. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने या निर्णयाची अंमलबजावणीच करणार नसल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणार नाही. या दोन्ही सोयाबीन उत्पादित राज्यांनीच या निर्णयाला विरोध केला आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन खाद्यतेलचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण प्रत्यक्षातील स्थिती ही वेगळीच आहे.

शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी दराच्या बाबतीत अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत. आता सोयापेंड स्टॅाक, मध्यंतरी सोयापेंड आयातीची चर्चा आणि आता वायद्यांवरील बंदी असे निर्णय घेऊन सर्वकाही अस्थिर असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता केवळ शेतीमालाची टप्प्याटप्प्याने विक्री करायची. त्यामुळे पुरवठा कमी मागणी अधिक अशी स्थिती झाली की त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता बाजारात सोयबीनची आवक कमी कशी राहिल हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनांचा केंद्र सरकावरच निशाना

केवळ आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच केंद्र सरकार हे निर्णय घेत आहे. आता सोयापेंडच्या स्टॅाक लिमिट घालून दिले आहे. मध्यंतरी वायद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकांसाठी सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा सरकार विचार करीत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी पॅनिक सेलींग टाळून टप्प्याटप्प्यानेच विक्री करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?

शेतकऱ्यांनो पुढे धोका आहे | हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.