…तरीही सोयाबीनवरच भर, बिजोत्पादनासाठी महाबीजच्या मदतीला कृषी विभागही सरसावला

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सोयाबीनच्या क्षेत्रात कायम वाढ झाली आहे. आता क्षेत्र वाढणार म्हटल्यावर पेऱ्यासाठी बियाणे नको का? म्हणूनच महाबीजकडून सबंध राज्यभर बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 25 हजार हेक्टरावर उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन केले जाणार आहे. त्यातून जे उत्पादन होईल ते आगामी हंगामातील सोयाबीनच्या पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरले जाणार आहे.

...तरीही सोयाबीनवरच भर, बिजोत्पादनासाठी महाबीजच्या मदतीला कृषी विभागही सरसावला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 4:59 PM

पुणे : आता कुठे सोयाबीनची काढणी झाली आहे. खरिपात सर्वाधिक नुकसान याच पिकाचे झाले असताना सोयाबीनवर कसला आलाय भर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण आगामी हंगामातही शेतकरी हे सोयाबीनवरच भर देणार आहेत. कारण गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सोयाबीनच्या क्षेत्रात कायम वाढ झाली आहे. आता क्षेत्र वाढणार म्हटल्यावर पेऱ्यासाठी बियाणे नको का? म्हणूनच महाबीजकडून सबंध राज्यभर बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 25 हजार हेक्टरावर उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन केले जाणार आहे. त्यातून जे उत्पादन होईल ते आगामी हंगामातील सोयाबीनच्या पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरले जाणार आहे.

हंगामाच्या आगोदरच बियाणांची तयारी ही महाबीजला करावी लागते. यंदाही सोयाबीनवरच भर देण्यात आला होता. मात्र, पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले त्यामुळे भविष्यात टंचाई निर्माण होऊ शकते म्हणून आतापासूनच महाबीज हे तयारीला लागले आहे. 25 हजार हेक्टरामध्ये 1 लाख 75 हजार 800 क्विंटल बियाणे मिळेल असा आशावाद महाबीजला आहे. या नियोजनामध्ये कृषी विभागही महाबीजची मदत करीत आहे.

नुकसान होऊनही सोयाबीनवरच राहणार भर

यंदा खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच नुकसानीमुळे बिजोत्पादनाचेही नियोजन हुकले आहे. त्यामुळेच आता उन्हाळी सोयाबीनवर भर दिला जात आहे. यामाध्यमातून उत्पादन वाढवून सन 2022 मध्ये बियाणांची कमतरता भासू द्यायची नाही म्हणून महाबीज कामाला लागले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कार्यक्रम घेऊन त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे अवाहन केले जात आहे. कारण दरवर्षी सोयाबनच्या क्षेत्रात वाढ होत असून सध्याचे दर पाहता पुन्हा सोयाबीनवरच शेतकरी भर देणार असल्याने बिजोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात होत आहे वाढ

सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक आहे. केवळ मराठवाड्यातच नाही मध्यप्रदेशामध्येही सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय यंदा दरात होत असलेली वाढ ही देखील वाढीव क्षेत्रासाठीचे कारण होऊ शकते. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हे 38 लाख 84 हजार हेक्टर एवढे आहे. तर यंदा 43 लाख 44 हजार हेक्टकावर पेरा झाला होता शिवाय गतवर्षी 46 लाख 17 हजार हेक्टरावर पेरा झाला होता. दरवर्षी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा होत आहे. त्यामुळे बिजोत्पादनाचा कार्यक्रम महाबीजने हाती घेतला आहे.

मूग, तीळ, उडदावरही भर

दरवर्षी केवळ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बिजोत्पादन करुन घेतले जाते. पण यंदा महाबीजही बीजोत्पादन करणार आहे. 20 जिल्ह्यांमध्ये महाबीज स्वता: 1469 हेक्टरावर उन्हाळी बिजोत्पादन करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मूग, तूळ, उडीद या पिकांचा सहभाग राहणार आहे. सोयाबीन बरोबर इतर पिकांचेही नुकसान पावसामुळे झाले होते. त्यामुळे उन्हाळी हंगामात बियाणांसाठी हा कार्यक्र राज्यभर राबविला जात आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही…!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.