AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drone Farm : ‘ड्रोन’द्वारे फवारणी धोक्याचीच, कीटकनाशक विषबाधित व्यक्ती संघटनेच्या पत्रात दडलंय काय?

ड्रोनच्या माध्यमातून वेळेची बचत आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी होत असले तरी दुसरी बाजू लक्षात घेणे तेवढेच महत्वाचे आहे. यवतमाळमध्ये काही वर्षापूर्वी कापसावरील बोंडअळी नियंत्रणासाठी अनेक असंबंध कीटकनाशके एकत्र करुन फवारणी करण्यात आली होती. त्याचे परिणाम यवतमाळ जिल्ह्यात अजूनही अनुभवयास मिळतात.तीच परस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

Drone Farm : 'ड्रोन'द्वारे फवारणी धोक्याचीच, कीटकनाशक विषबाधित व्यक्ती संघटनेच्या पत्रात दडलंय काय?
आता शेतकऱ्यांनाही अनुदानावर ड्रोन देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 9:46 AM

नागपूर : सध्या शेती (Agricultural) व्यवसायात आत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे.यामधूनच गेल्या काही दिवसांपासून (Drone Farming) ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे. शिवाय यासाठी (Central Government) केंद्र सरकारही आग्रही आहे. अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे कीटकनाशकांवर फवारणीसाठी ड्रोन चा वापर केला जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र कीटकनाशक विषबाधित व्यक्ती संघटनेने या हवाई फवारणी धोरणाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीचे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांनाच लिहले आहे. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचे राहणार आहे.

यवतमाळच्या घटनेचा हवाला देत संघटनेचे म्हणणे काय?

ड्रोनच्या माध्यमातून वेळेची बचत आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी होत असले तरी दुसरी बाजू लक्षात घेणे तेवढेच महत्वाचे आहे. यवतमाळमध्ये काही वर्षापूर्वी कापसावरील बोंडअळी नियंत्रणासाठी अनेक असंबंध कीटकनाशके एकत्र करुन फवारणी करण्यात आली होती. त्याचे परिणाम यवतमाळ जिल्ह्यात अजूनही अनुभवयास मिळतात.तीच परस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे. हवेतून किटकनाशकाच्या फवारणीची प्रात्याक्षिके संबंधीतांपर्यंत पोहचली नाही तर त्याचे दुष्पपरिणाम होतात. या सर्व बाबाींचा विचार व्हावा म्हणून या संघटनेची मागणी आहे.

प्रशिक्षण, माहितीविनाच ड्रोनशेतीचा गाजावाजा

ड्रोनचा शेती व्यवसयामध्ये वापर होण्यापूर्वी योग्य ते प्रशिक्षण आणि सर्व माहिती दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ड्रोन खरीदेची वेळ आली तरी ना प्रशिक्षण त्यासंबंधीची माहिती. त्यामुळे थेट ड्रोनचा वापर केला तर त्याचे धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरण, जैवविविधतेला देखील यामाध्यमातून धोका निर्माण होऊ शकतो. याबाबतचा विचार मसुद्यात करण्यात आलेला नाही असे या संघटनेचे म्हणणे आहे, त्यामुळे प्रत्यक्ष वापरापूर्वी योग्य तो विचार महत्वाचा असल्याचे संघटनेच्या या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतीसाठी ड्रोन वापराण्याची नियमावली

भारतीय शेतीमध्ये आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांनी संशोधन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला आहे. शेतकरी ठिबक सिंचन आणि विविध प्रकारच्या यंत्रे भारतातील शेतीसाठी वापरली जात आहेत. ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे. ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होईल. एखाद्याला ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतात फवारणी करायची असेल तर त्याला संबंधित अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर कळवावे लागणार आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.