मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय (Farming) आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची मागणीही वाढली आहे. अशा नगदी पिकांच्या शेतीमधून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.
अलीकडच्या काळात लेमन ग्रासची शेती फायदेशीर ठरणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. या गवताची लागवड करण्यासाठी तुम्हाला अवघा 20 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, यामधून तुम्ही महिन्याला 4 लाखांपर्यंतचे उत्पन्न कमावू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्यंतरी ‘मन की बात’मध्ये लेमन ग्रासच्या शेतीविषयी भाष्य केले होते. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले होते. लेमन ग्रासचा वापर कॉस्मेटिक, साबण, तेल आणि औषधे अशा अनेक उत्पादनांमध्ये होतो. त्यामुळे बाजारपेठेत लेमन ग्रासला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे अगदी दुष्काळग्रस्त भागातही लेमन ग्रासची शेती होऊ शकते. एका हेक्टरवर लेमन ग्रासचे पिक घेतल्यास तुम्हाला महिन्याला साधारण 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
लेमन ग्रासच्या शेतीसाठी कोणत्याही खताची गरज नसते. तसेच गुरे किंवा जंगली जनावरांनी ही शेती उद्ध्वस्त करण्याचाही धोका नसतो. एकदा पेरणी केल्यानंतर सहा ते सात वर्षे लेमन ग्रासचे पिक येत राहते. फेब्रुवारी ते जुलै हा लेमन ग्रासच्या पेरणीसाठी उत्तम काळ मानला जातो. एकदा पेरणी केल्यानंतर लेमन ग्रासची सहा ते सातवेळा कापणी होते. यापासून तेलही निघते. त्यामुळे बाजारपेठेत लेमन ग्रासला मोठी मागणी आहे.
संबंधित बातम्या:
पाण्यावर चारा निर्मिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नेमकं काय?
शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई
Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा