राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 साठी विविध पिक विमा कंपनीस शासनाच्या वतीने राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. राज्य सरकारने 6 विमा कंपन्यांना 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये अदा केले आहेत त्याअनुशंगाचा शासन निर्णयही झाला

राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 9:35 AM

लातूर : पावसाने खरीपातील सर्वच पीकाचे नुकसान झालेले आहे. या दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 साठी विविध पिक विमा कंपनीस शासनाच्या वतीने राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. राज्य सरकारने 6 विमा कंपन्यांना 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये अदा केले आहेत त्याअनुशंगाचा शासन निर्णयही झाला असून ऐन गरजेच्या दरम्यान या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी हि महाराष्ट्र राज्यातील पिक विमा कंपन्याची समन्वयक कंपनी आहे. ही रक्कम राज्य सरकारची असून यामध्ये केंद्र सरकारच्या रकमेचीही भर पडणार आहे. राज्यात वेगवेगळ्या सहा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून विमा भरुन घेतलेला होता.

पावसामुळे अधिकचे नुकसान

खरीप हंगामातील पेरणी होतीच पीक विमा भरुन घेण्यास सुरवात झाली होती. निसर्गाचा लहरीपणा यामुळे यंदाही अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. यंदा पावसाने खरीपातील पीकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विम्यापोटी तरी अधिक रक्कम मिळेस अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या राज्य सरकारने त्यांच्या हिश्याची रक्कम वर्ग केलेली आहे. काही दिवसांमध्ये केंद्र सरकारही आपली रक्कम वितरीत करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना पीकाचा विमा मिळणार आहे.

या पीक विमा कंपन्यांना रक्कम वितरीत

भारतीय कृषी विमा कंपनी इफ्को टोकियो जनरल इन्सुरंस कं.लि. रिलायन्स जनरल इन्सुरंस कं. लि. भारतीय ॲक्सा इन्सुरंस कं. लि. बजाज अलियान्स इन्सुरंस कंपनी लिमिटेड एचडीएफसी इर्गो इन्सुरंस कंपनी लिमिटेड.

पिक नुकसानीसाठी दावा करा.

सध्या महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस सुरु असून अनेक पिकांचे नुकसान झालेले आहे आणि अशामध्ये हा शासन निर्णय नक्कीच शेतकरी बांधवांना दिलासा देणारा ठरणार आहे. जर पिक विमा काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर लगेच पिक नुकसानीसाठी दावा करा. crop loss intimation form pdf डाउनलोड करा आणि पिक विमा कंपनीस सादर करा. तुमच्या तालुक्यातील पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये सादर करून तुमच्या शेतातील पिक नुकसानीसाठी दावा करू शकता.

नुकसानीचा दावा केल्यानंरची प्रक्रीया

1) शेतकऱ्यांना ‘क्रॅप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.

4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.

5) पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.

6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

या परिस्थितीमाध्ये उपयोगी पडणार हे पर्याय

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, शेत जमिन जलमय झाल्यास तसेच गारपीट, ढगफुटी शिवाय वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगी शेतकऱ्यांना या सहा पर्यांयांचा उपयोग होणार आहे.

या आहेत आवश्यक बाबी..

नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला याबाबतची सुचना देणे आवश्यक आहे. याकरिता वरील सहाही पर्याय हे खुले असणार आहे. नेमून दिलेल्या वेळेत तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीलाही योग्य ती कारवाई करता येणार आहे. (State government provides relief to farmers, 973 crore companies classified for crop insurance)

 संबंधित बातम्या :

हातातोंडाशी आलेलं सोयाबीन मातीमोल, रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, सॅम्पल पंचनामे करा, सेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल : केंद्रीय कृषी मंत्री

ऊस गाळपासाठी साखर कारखाना निवडायचा हक्क शेतकऱ्यांचाच, एफआरपी रक्कम थकीतच

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.