Success Story : ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, 40 हजारात ‘नंदी ब्लोअर’; सोलापूरच्या शेतकऱ्याचा अनोखा जुगाड

उत्पादनवाढीसाठी जो तो प्रयत्न करीत आहे. पण सर्वच शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री आणि सर्वकाही हे शक्य नाही. त्यामुळे चव्हाण यांनी केलेला प्रयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. आता मनुष्यबळाने शेती कामे उरकणे शक्य नाही. तर दुसरीकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शेतकरी हा असे प्रयोग करीत आहे.

Success Story : ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, 40 हजारात 'नंदी ब्लोअर'; सोलापूरच्या शेतकऱ्याचा अनोखा जुगाड
पीक फवारणीसाठी सोलापूरच्या शेतकऱ्याने अत्याधुनिक यंत्र निर्माण केले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:47 AM

सोलापूर : काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये (Use of machinery) यंत्रसामुग्रीचा वापर वाढला पाहिजे. असे असले तरी यंत्रासाठी पैशाची उभारणी कशी करावी असा प्रश्न (Small holder farmer) अल्पभूधारक शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग न करता अनेक शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. मात्र, मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावच्या एका तरुण शेतकऱ्याने कोणतेही गऱ्हाणे न करता पीक पध्दतीमध्ये बदल केला आणि उत्पादनवाढीवर भर दिला आहे. एवढेच नाहीतर (Crop spray) पीक फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री न घेता केलेले जुगाड आता चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी 40 ‘नंदी ब्लोअर’ केला असून याद्वारेच आता द्राक्षासह इतर पिकांची ते फवारणी करीत आहे. यंत्रासाठी 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च करणे शक्य नसल्याने त्यांनी हे जुगाड अवघ्या 40 हजारात लावले आहे.

खर्चासह वेळेची बचत

मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावच्या ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण या शेतकऱ्याने पीक फवारणीसाठी एक अनोखा जुगाड केलाय. केवळ 40 हजारात फवारणीसाठी ‘नंदी ब्लोअर’ तयार केलाय. ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण यांनी दोन वर्षापूर्वी दोन एकर द्राक्षे लागवड केली होती. मात्र द्राक्ष बाग फवारणीसाठी मजूरांमार्फत मोठा खर्च होत होता. सोबतच वेळ ही जास्त लागत होता. यामुळे मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर आणि लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारात गाडा तयार केला आहे. यामाध्यमातूच ते आता पीक फवारणीचे काम करीत आहेत.

नेमके काय आहे जुगाड?

पीक फवारणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्र सामुग्री चव्हाण यांनी बैलगाडीत बसवलेली आहे.पाठीमागील बाजुस एसटीपी पंप बसवला आहे. त्यापुढे 5 एचपीचे डिझेल इंजिन आणि दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॅरल ठेवला आहे. त्यामध्ये 20 एमएम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला. बाजारातून खरेदीकरुन फवारणीसाठी दोन्ही बाजुला चार-चार स्प्रे गन बसवले. सर्वात पुढे एक बैल जुंपता यावा अशी व्यवस्था केली. या सर्व यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी त्यांना चाळीस हजार खर्च आला.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचा हा ‘ट्रॅक्टरच’

उत्पादनवाढीसाठी जो तो प्रयत्न करीत आहे. पण सर्वच शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री आणि सर्वकाही हे शक्य नाही. त्यामुळे चव्हाण यांनी केलेला प्रयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. आता मनुष्यबळाने शेती कामे उरकणे शक्य नाही. तर दुसरीकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शेतकरी हा असे प्रयोग करीत आहे. त्यामुळे ‘नंदी ब्लोअर’चा प्रयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.