सोयाबीनची साठवणूक अन् हरभऱ्याची विक्री, काय स्थिती आहे खरेदी केंद्रावरची?
रब्बी हंगामातील काढणी होत असलेल्या हरभऱ्याची काढणी झाली की मळणी आणि थेट बाजारात विक्री करण्याचा जणूकाही शेतकऱ्यांनी निर्धारच केला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन हे खरिपातील पीक असतानाही शेतकरी त्याच्या साठवणूकीवरच भर देत आहे. अजूनही सोयाबीनच्या दरात वाढ होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. त्यामुळे सोयाबीनची मुख्य बाजारपेठ असलेल्या लातुरात आवक ही मर्यादीतच राहत आहे.
लातूर : (Rabi Season) रब्बी हंगामातील काढणी होत असलेल्या (Chickpea Crop) हरभऱ्याची काढणी झाली की मळणी आणि थेट बाजारात विक्री करण्याचा जणूकाही शेतकऱ्यांनी निर्धारच केला आहे. तर दुसरीकडे (Soybean Crop) सोयाबीन हे खरिपातील पीक असतानाही शेतकरी त्याच्या साठवणूकीवरच भर देत आहे. अजूनही सोयाबीनच्या दरात वाढ होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. त्यामुळे सोयाबीनची मुख्य बाजारपेठ असलेल्या लातुरात आवक ही मर्यादीतच राहत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनला 7 हजार 350 रुपये दर असतानाही आवक ही 18 हजार पोत्यांचीच होती तर दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दर असतानाही हरभऱ्याची आवक ही वाढत आहे. मात्र, हरभरा उत्पादक शेतकरी आता खरेदी केंद्रावरही मालाची विक्री करतानाचे चित्र आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीन काढणीला आले तरी शेतकरी खरिपातील सोयाबीन साठवणूकीवर भर देत आहे.
खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची रेलचेल
नाफेडच्यावतीने राज्यात हरभरा खरेदी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सुरवातीला याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती पण बाजारपेठेतील कमी दर यामुळे शेतकरी आता नोंदणी करु लागले आहेत. खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 600 चा दर आहे तर केंद्र सरकारने खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून दिला आहे. प्रति क्विंटलमागे 600 रुपयांचा फरक पडत असल्याने शेतकरी आता खरेदी केंद्रच जवळ करीत आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि नोंदणी करुन शेतकऱ्यांना माल विकता येणार आहे.
खरेदी केंद्रावरील नेमकी प्रक्रिया असते तरी कशी?
खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास अगोदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या दरम्यान, आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ ‘अ’, पिकपेरा किंवा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकाची केलेली नोंदणी आदी कागदपत्रे जमा करुन नोंदणी करावी लागते. त्यानंतर खरेदी केंद्रावरुन फोन किंवा एसएमएस द्वारे शेतीमाल घेऊन येण्याबाबत सुचना केल्या जातात. त्यानुसार हरभऱ्याची खरेदी होणार आहे. शेतीमालाच्या विक्रीनंतर 15 दिवसांमध्येच शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे खरेदी केंद्र चालक लालासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे.
सोयाबीन साठवणूकीवरच भर
सोयाबीन खरिपातील असे पीक आहे ज्याची काढणी सर्वात अगोदर होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच आहे. शेतकरी शेतीमालाची साठवणूक करुन ठेवत नाही. पण यावेळी व्यापाऱ्यांची भूमिका शेतकरीच बजावत आहेत. हंगामाच्या सुरवातीला काढणी झालेले सोयाबीन दरवाढीच्या प्रतिक्षेत अजूनही थप्पीलाच आहे. सध्या 7 हजार 300 चा दर असतानाही शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतिक्षा आहे.
संबंधित बातम्या :
Hingoli : वसमतमध्ये हळद संशोधन केंद्राची होणार उभारणी, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?
Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यातील व्यवस्थापनाने वाढेल उत्पादन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
महावितरणचा ‘शॉक’ फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना