असा हा उपक्रम ! खतापासून धान्य अन् धान्यापासून पुन्हा कंपोस्ट खत
शेती उत्पादन वाढविण्यासाठी आपण कंपोस्ट खताचा वापर करावा लागतो याची माहिती प्रत्येकालाच असेल पण धान्यापासून खत तयार हे जरा वेगळं वाटतंय ना. पण असं झालं आहे. गतवर्षी वैनगंगा या नदीला भीषण पूर आला होता. त्यावेळी सरकारी गोदाममध्ये ठेवण्यात आलेले तब्बल 6 हजार क्विंटल धान्य हे भिजले होते.
मुंबई : शेती उत्पादन वाढविण्यासाठी आपण कंपोस्ट खताचा वापर करावा लागतो याची माहिती प्रत्येकालाच असेल पण धान्यापासून खत तयार हे जरा वेगळं वाटतंय ना. पण असं झालं आहे. गतवर्षी वैनगंगा या नदीला भीषण पूर आला होता. त्यावेळी सरकारी गोदाममध्ये ठेवण्यात आलेले तब्बल 6 हजार क्विंटल धान्य हे भिजले होते. त्यामुळे आता या सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे.
गतवर्षी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला भीषण पूर आला होता. या पूरात सरकारी गोदामात साठवणूक केलेल्या धान्याची नासाडी झाली होती. दरम्यान, नंतर हे धान्य वाळवून चांगले करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला होता. परंतू, धान्य हे अधिक खराब झाले होते. त्यामुळे खराब झालेले धान्याचे आता कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठविला होता. यानंतर प्रस्तावाला मंजुरी मिळालेली असल्याने आता या खराब झालेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. 1999 च्या अन्नधान्यासंदर्भाच्या निर्णयानुसार सरकारने मंजुरी दिलेली आहे.
नष्ट झालेल्या धान्यात काय-काय होते
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला गेल्यावर्षी पूर आला होता. त्यामुळे सरकारी गोदामात 6 ते 7 फुट एवढे पाणी साचले होते. गोदामात असलेल्या 17 हजार क्विंटल धान्यापैकी 6 हजार 263 क्विंटल धान्य हे नष्ट झाले होते. यामध्ये 3 हजार 826 क्विंटल तांदूळ, 1 हजार 833 क्विंटल गहू, 266 क्विंटल तूर दाळ, 188 क्विंटल चणा डाळ, 144 क्विंटल साखर होती.
यामुळे घ्यावा लागला निर्णय
पुरातील पाण्यात धान्य भिजल्यानंतरही ते वाळवून चांगले करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला होता. धान्य चांगले वाळवून ठेवण्यातही आले होते परंतु, परिसरात त्याची दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होऊ लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार धान्य
गेल्या वर्षभरापासून सडलेले हे धान्या गोदामात होते. जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानंतर आता हे सरकारच्या ताब्यात आहे. येथील साकोली कृषी विज्ञान केंद्रा हे धान्य पाठवले जाणार असून येथेच या सडलेल्या धान्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. (Such an initiative! Compost make better crop and then corn make compost letter)
इतर बातम्या :
काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली, त्यांनीच चोरली-डाका मारला, नाना पटोलेंलं शरद पवारांना उत्तर
VIDEO : Ganesh Chaturthi 2021 | मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे भाई जगताप यांच्या घरी बाप्पा विराजमान
वाह, नशीब असावे तर असे! ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी 7 कोटींच्या लॉटरीने नशीबही पालटले!