AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paddy Crop : धान पिकाच्या संवर्धनासाठी अवलियाचा अनोखा उपक्रम, 24 वर्षापासून मोफत बियाणांचे वाटप

धान शेतीला मोठा इतिहास आहे. तांदूळ शास्त्रज्ञ आर.एच.रिचारिया यांच्या मते 1970 च्या दशकापर्यंत देशात तांदळाच्या 1 लाख 10 हजार जातीची बियाणे होती. यामुळे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने सुध्दा अधिकच्या उत्पादन देणाऱ्या जाती आणि शेतकऱ्याच्या स्वदेशी वाणांच्या जागी उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, यामधून उत्पादन वाढत नसल्याने देब यांनी पुन्हा देशी वाणाच्या सर्वेक्षणावर भर दिला होता.

Paddy Crop : धान पिकाच्या संवर्धनासाठी अवलियाचा अनोखा उपक्रम, 24 वर्षापासून मोफत बियाणांचे वाटप
धान पिकाचे देशी वाण संवर्धनासाठी बियाणे बॅंक उभारण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 11:46 AM

मुंबई : देशातील (Paddy Crop) धान शेतीला मोठा इतिहास आहे. शिवाय हा इतिहास टिकवून ठेवण्याचे काम काही अवलियांनी केल्याने आज काळाच्या ओघात (Paddy Farmer) धान शेतीचे चित्र बदलले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी कोणते बियाणे वापरले जात होते, धान शेतीचा नेमका इतिहास काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. धान पिकाच्या नेमत्या जाती कोणत्या? काळाच्या ओघात जुन्या जातीचे वाण लोप पावत आहे. बदलत्या स्वरुपामुळे उत्पादनात वाढ झाली असली तरी दर्जा ढासळला आहे. त्यामुळेच जुनं तेच सोनं म्हणत पुन्हा जुन्या जातीचे वाण नव्याने समोर येत आहे.जुन्या जातीचे वाण संवर्धनासाठी काम करीत असलेल्या अवलियाचे नाव आहे पर्यावरण शास्त्रज्ञ देबल डेब. हो त्यांनी जुन्या वाणाचे संवर्धन तर केलेच आहे पण याचे क्षेत्र वाढण्यासाठी त्यांनी (Seed Bank) बियाणे बॅंक सुरु केली असून शेतकऱ्यांना ते मोफत धान पिकाचे बियाणे देत आहे. गेल्या 20 वर्षापासून त्यांची ही बॅंक सुरु आहे.

नेमकी कशी झाली सुरवात

पर्यावरण शास्त्रज्ञ देबल डेब हे दक्षिण बंगालमध्ये झाडांच्या जैवविविधतेचे सर्वेक्षण करीत होते. त्यावेळी एका शेतकऱ्याची गर्भवती पत्नी ही भुतामुरी तांदळाची पेस्ट पित असल्याचं त्यांना दिसून आले. या तांदळाची पेस्ट पिल्याने महिला ही अॅनिमियासारख्या गंभाीर आजारातून बऱ्या होतात. त्यानंतरच देब यांनी दुर्मिळ अशा तांदळाच्या जुन्या जातीवर संशोधन सुरु केले.याकरिता त्यांनी 2001 मध्ये बासुधा नावाच्या फार्मची स्थापानाही केली. तर रायगड जिल्ह्यामध्ये जंगले आणि टेकड्यांनी वेढलेल्या एका आदिवासी गावात त्यांची 1 एक्कर 7 गुंठे एवढी जमिनही आहे.

देशात तांदळाच्या जाती किती?

धान शेतीला मोठा इतिहास आहे. तांदूळ शास्त्रज्ञ आर.एच.रिचारिया यांच्या मते 1970 च्या दशकापर्यंत देशात तांदळाच्या 1 लाख 10 हजार जातीची बियाणे होती. यामुळे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने सुध्दा अधिकच्या उत्पादन देणाऱ्या जाती आणि शेतकऱ्याच्या स्वदेशी वाणांच्या जागी उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, यामधून उत्पादन वाढत नसल्याने देब यांनी पुन्हा देशी वाणाच्या सर्वेक्षणावर भर दिला होता. धान पिकाच्या वाणावरील संशोधन 2006 साली पूर्ण झाल्यानंतर 90 टक्के जाती ह्या नाहीशा झाल्याचे निदर्शनास आले होते. संवर्धनासाठी सरकराने आखडता घेतल्याने पुन्हा देब यांनी संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यातूनच बासुधा बॅंकेचा उदय झाला होता.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे आहे मोफत बियाणे बॅंकेचे व्यवहार

देब यांनी स्वत: प्रयत्न करुन ओडिशामध्ये एक अशी बॅंक उभारली आहे ज्यामधून आता शेतकऱ्यांना मोफत धान पिकासाठी बियाणे पुरवले जात आहेत. यामुळे देशी बियाणांची संस्कृती जोपासली जात आहे. तर तांदळाच्या जुन्या वाणांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जात आहे.या बॅंकेत तांदळाच्या जुन्या वाणाचे बियाणे दिले जात आणि त्याबदल्यात शेतकऱ्याकडून कोणतेही वाण घेतले जाते. शिवाय उत्पादन वाढीसाठी बियाणे हे गोमूत्राने सिंचित केले जाते. देब यांची ही बियाणे बॅंक 1998 मध्ये 21 वाण घेऊन सुरु झाली होती. आता त्यांच्याकडे जवळपास 1 हजार 440 जातीची बियाणे आहेत. तर याकरिता 7 हजार 600 पेक्षा अधिक शेतकरी राबत आहेत.

बियाणांचा विस्तार कुठपर्यंत?

देब यांच्या बियाणे बॅंकमध्ये संपूर्ण भारतामधील बियाणांच्या जाती तर आहेतच पण बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, कोरिया, फिलिपाईन्स आणि इटली या देशांमधून मिळणाऱ्या विविध धानाच्या जाती आहेत. यामध्ये अशा एका वाणाचा समावेश आहे ज्यामध्ये काहीप्रमाणात चांदीचा अंश असतो. याकरिता 3 मिटर पाणी पातळी असणे गरजेचे आहे. मीठयुक्त अशा 15 जाती आहेत ज्या समुद्रातील पाण्यावरही वाढू शकतात. तर 12 जाती ह्या दुष्काळी भागातही सहज जोपासल्या जातात.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.