AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indapur : काही तासांपूर्वी घेतलेल्या 54 शेळ्या डोळ्यादेखत दगावल्या, शेतकऱ्यावर हे काय आभाळ कोसळलं?

पारंपरिक शेतीमध्ये केवळ कष्ट आणि कष्टच आहे त्यामुळे नितीन आणि अतुल याने काहीतरी नवीन करुन दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांनी अथक परीश्रम तर घेतलेच पण पाण्यासारखा पैसा खर्ची करुन शेळीपालनाला सुरवात केली होती. एका शेळीपासून केलेली सुरवात आता 54 संख्येवर पोहचली होती. पण अवघ्या काही वेळात सर्वच्या सर्व शेळ्या दगावणे यापेक्षा वेगळे दु:ख ते काय?

Indapur : काही तासांपूर्वी घेतलेल्या 54 शेळ्या डोळ्यादेखत दगावल्या, शेतकऱ्यावर हे काय आभाळ कोसळलं?
इंदापूर येथे अवघ्या काही तासांमध्ये 54 शेळ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:52 AM

इंदापूर : शेती व्यवसायात नवीन काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीने तरुण शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. यामधून कुणाची यशोगाथा होते तर कुणाच्या पदरी निराशा. असाच प्रकार (Indapur) इंदापुरातील 2 युवकांसोबत घडला आहे. (Traditional farming) पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी येथील नितीन पांढरे व अतुल घोडके या दोघांनी गेल्या अनेक महिन्यांपासून (Sheep rearing) शेळी पालन व्यवसाय उभारला होता. जिल्हाभरातील जनावरांचे आठवडी बाजार पालथे घालून शेळ्यांची आणि बोकडाची खरेदी करीत होते.अशा पध्दतीने त्यांनी 54 शेळ्या आणि बोकडाची खरेदी झाली होती. मात्र रविवारी अवघ्या 1 तासाच्या आतमध्येच या शेळ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे नितीन आणि अतुलच्या पायाखालची मातीच सरकली. काही लक्षात येण्यापूर्वीच एका माघून एक अशा शेळ्या दगावल्या आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत आणि स्वप्न सर्वकाही धुळीस मिळाले असेच झाले आहे.

शुन्यातू केली होती सुरवात, शेवटही शून्यातच

पारंपरिक शेतीमध्ये केवळ कष्ट आणि कष्टच आहे त्यामुळे नितीन आणि अतुल याने काहीतरी नवीन करुन दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांनी अथक परीश्रम तर घेतलेच पण पाण्यासारखा पैसा खर्ची करुन शेळीपालनाला सुरवात केली होती. एका शेळीपासून केलेली सुरवात आता 54 संख्येवर पोहचली होती. पण अवघ्या काही वेळात सर्वच्या सर्व शेळ्या दगावणे यापेक्षा वेगळे दुख ते काय?

4 शेळ्यांचे शवविच्छेदन, पशुवैद्यकीय अधिकारीही घटनास्थळी

अचानकच 54 शेळ्या दगावल्याने कुणाच्याच काही लक्षात आले नाही की नेमका प्रकार काय आहे तो. या घटनेची माहिती पशूवैद्यकी अधिकारी यांना देताच अवघ्या काही वेळेत हजरही झाली. त्यांनी प्राथमिक तपासणी करुन चार शेळ्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याबाबत सध्या तरी सर्वजण अनभिज्ञच आहेत.

अहवालानंतरच चित्र स्पष्ट

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली पशुवैद्यकीय अधिकारी या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले व तेथील चार शेळ्यांचे शवविच्छेदन करून पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. आता येथील अहवालावरच सर्वकाही अवलंबून आहे. अचानक सर्वच शेळ्यांचा मृत्यू झाल्याने विषबाधा की अन्य काही याचा तपास आता अहवालानंतरच लागेल.

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.