महिन्याभरापूर्वी घटलेल्या अंड्यांच्या दरात अचानक वाढ, पावसाचाही परिणाम दरावर
महिन्याभरापूर्वी अचानक अंड्याचे दर हे कमी झाले होते. नवरात्र आणि श्रावण महिन्याचे निमित्त होते. पण आता दरवाढामागे वेगळी कारणे आहेत. सध्या थंडीला सुरवात झाली असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही घडले मात्र, मध्यतंरीच्या पावसामुळे अनेक कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला ते देखील दर वाढीमागचे कारण आहे.
मुंबई : महिन्याभरापूर्वी अचानक अंड्याचे दर हे कमी झाले होते. नवरात्र आणि श्रावण महिन्याचे निमित्त होते. पण आता दरवाढामागे वेगळी कारणे आहेत. सध्या (Increase in egg prices) थंडीला सुरवात झाली असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही घडले मात्र, मध्यतंरीच्या पावसामुळे (impact of rains) अनेक कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला ते देखील दर वाढीमागचे कारण आहे. थंडीमुळे चिकन आणि अंडे खाणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
त्यामुळे किरकोळ बाजारात अंड्याची किंमत ही 7 रुपये झाली आहे तर चिकन हे 250 रुपये किलोवर गेले आहे. हवामानातील बदलाचे परिणाम सध्या या मार्केटवर जाणवत असून भविष्यात अणखीन दर वाढतील अशी शंका उपस्थित केली जात आहे. केवळ बदलत्या वातावरणामुळेच नाही तर गतमहिन्याच झालेल्या पावसामुळे अनेक लहान पिल्लांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे कोंबड्याचा तुटवडा बाजारात भासत आहे.
खर्च वाढला की किमतीमध्ये फरक
पोल्ट्रीफार्म चालकांचा खाद्यावरील खर्च वाढला आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात कोंबडीची किंमत 160 रुपये किलो झाली आहे. तर अंड्यांची किंमत ठोक बाजारात 4 ते 5 रुपये आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्याची किंमत दोन रुपयांनी महाग होऊ शकत. बुधवारी दिल्लीतील गाझीपूर मुरगामंडी येथे ही किंमत 150 रुपये किलो होती.
दुसरीकडे, थेट ग्राहकापर्यंत माल पोहचेपर्यंत त्याची किंमत ही 200 रुपयांवरून 250 रुपये प्रति किलो झाली आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करीत असलेले नजीब मलिक म्हणाले की, नवरात्रीच्या शेवटी कोंबडीच्या किंमतीत वाढ झाली. येत्या काही दिवसांत त्यात सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे आधीच शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.
पावसाचे नुकसान
मध्यंतरीच्या पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. कोंबड्यां पिल्ले हजारोंच्या संख्येने मरण पावली आहेत. याचा परिणाम येत्या काही दिवसांत कोंबड्यांच्या किंमतीवरही होईल. अंड्यांच्या किंमतीत फारशी वाढ झालेली नाही कारण गेल्या महिनाभराने शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये अंडी ठेवली आहेत. त्यामुळे अंड्याची किंमत 7 ते 8 रुपये आहे. तर घाऊक ठोक बाजारात 400 ते 450 रुपये शेकडा आहेत. देसी चिकनच्या किंमतीत प्रतिकिलो 360 रुपये मिळत आहेत.
त्याची किंमत 450 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. नॅशनल एग कॉर्पोरेशन कमिटीच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये अंड्यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली. अहवालानुसार, अंड्यांची सर्वाधिक मागणी मुंबईत झाली असून तेथे 100 अंड्यांची किंमत 500 रुपये मोठ्या प्रमाणात आहे. (Sudden increase in egg and chicken prices, rain also affects price hike)
संबंधित बातम्या :
‘सोन्या’ सारखा दर असताना कपाशीत जनावरे, अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना कायम
थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला