अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ‘एक घाव दोन तुकडे’, सहसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमबजावणी गरजेची

मराठवाड्यात यंदा अधिकचे गाळप होऊनही ऊसतोडीचा मुद्दा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अखेर प्रादेशिक सहसंचालक यांनी बीड जिल्ह्यात साखर कारखानदार तसेच लोकप्रतिनीधी यांच्याशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा ऊस फडात आहे तोपर्यंत साखर कारखाने हे सुरुच राहणार असल्याचे सहसंचालक शरद जरे यांनी सांगितले आहे.

अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर 'एक घाव दोन तुकडे', सहसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमबजावणी गरजेची
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:53 AM

बीड : यंदाचा ऊस गाळप हंगाम मध्यावर आलेला आहे. असे असताना पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे केवळ (Marathwada) मराठवाड्यातच नाही सबंध राज्यात अतिरीक्त ऊसाचे काय होणार असा प्रश्न समोर येत आहे. कारण वेळेत तोड झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषत: मराठवाड्यात यंदा अधिकचे ( Sugarcane Sludge) गाळप होऊनही (Sugarcane Area) ऊसतोडीचा मुद्दा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अखेर प्रादेशिक सहसंचालक यांनी बीड जिल्ह्यात साखर कारखानदार तसेच लोकप्रतिनीधी यांच्याशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा ऊस फडात आहे तोपर्यंत साखर कारखाने हे सुरुच राहणार असल्याचे सहसंचालक शरद जरे यांनी सांगितले आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे अखेर अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निकाली निघेल मात्र, झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

नेमके काय झाले बैठकीत?

बीडसह मराठवाड्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे. कारखान्यांकडील गाळप क्षमता, कारखान्याकडे झालेल्या नोंदी आणि भविष्यातील नियोजन या अनुशंगाने संहसंचालक यांनी मंगळवारी बैठक घेतली होती. मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस फडामध्ये राहणार नाही तर त्याचे गाळप होणारच आहे. हे गाळप पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने हे बंद होणार नसल्याचे सहसंचालक शरद जरे यांनी स्पष्ट केले आहे. कारखान्यांनी नोंदणी झालेल्या ऊसाचे गाळप करणे महत्वाचे असून विक्रमी उत्पादन आणि शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने बैठक

बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा मुद्दा मोठा चर्चेत होता. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी प्रादेशिक सहसंचालक यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावरील अवस्था निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे ही बैठक पार पडली आहे. यावेळी आ. नमिता मुंदडा, साखर कारखान्यांचे संचालक आणि शेतकरीही उपस्थित होते. त्यामुळे पर्याय तर समोर ठेवला आहे त्याची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.

लांबलेल्या तोडणीचा नेमका काय परिणाम?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.

संबंधित बातम्या :

15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक

Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?

Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.