अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!

सरकारच्या योजना ह्या केवळ घोषणांपर्यंतच मर्यादीत राहतात. प्रत्येक विभागाची हीच अवस्था आहे. आता ऊस कामगारांच्या कल्याणासाठी ऑगस्ट महिन्यातच सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा याकरिता ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या कामगारांचा विकास तर सोडाच पण अद्यापपर्यंत साधे ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेले नाही. दुसरीकडे अवकाळी ऊसतोड कामगारांचा संसार उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने केले जात आहे.

अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 9:45 AM

कराड : सरकारच्या योजना ह्या केवळ घोषणांपर्यंतच मर्यादीत राहतात. प्रत्येक विभागाची हीच अवस्था आहे. आता (Sugarcane workers) ऊस कामगारांच्या कल्याणासाठी ऑगस्ट महिन्यातच (state government) सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा याकरिता ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या कामगारांचा विकास तर सोडाच पण अद्यापपर्यंत साधे ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेले नाही. दुसरीकडे अवकाळी ऊसतोड कामगारांचा संसार उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने केले जात आहे. त्यामुळे घोषणांच्या पावसांमध्ये कामगारांची परवड होतेय याचे भान सरकारने ठेवणे गरजेचे आहे.

सरकारच्या घोषणांच्या पावसामध्ये ऊसतोड मजुरांचे हाल

सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना एक डिजीटल ओळखपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमध्येच केली होती. या माध्यमातून ऊसतोड कामगारांना महामंडळा अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना, आरोग्य विमा यासारख्या योजनांचा लाभ होणार आहे. मात्र, आता गाळप हंगाम मध्यावर आला असताना देखील कामगारांची नोंदच नसल्याने योजनेचा लाभ मिळणार कसा हा सवाल आहे. अहमदनगर जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक कामगार आहेत. पण एकाही कामगाराला ओळखपत्र हे मिळालेले नाही.

कारखान्याकडून कामगारांना मदतीचा हात

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कशी लूट होते याबाबत आपण नेहमी सांगत असतो. पण कारखान्यांचाच एक भाग असलेल्या कृषा सहकारी साखर कारखान्याने अडचणीत असलेल्या ऊसतोड कामगारांसाठा मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या अवकाळी कामगार हे अडचणीत आहेत. शिवाय शेतशिवारात पाणी साचल्याने ऊसतोडणीही खंडीत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना या कारखान्याकडून तब्बल 5 हजार कामगारांना मदत केली जात आहे.

अवकाळीमुळे कामगारांचे हाल

अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाल आहेत. तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये पाणी साचले आहे तर पावसामुळे ऊसतोडणीही करता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की ओढावलेली आहे. तर दुसरीकडे कारखाने बंद असल्याने कामगारांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न उपस्थित होत असतनाच कारखान्याने घेतलेली मदतीची भूमिका अनेकांसाठी महत्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.