शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत ‘एफआरपी’ तो ही व्याजासकट पदरात पडेल

ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आता एफआरपी अदा करण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे. त्यानुसार काही पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. मात्र, ही संख्या केवळ 47 एवढीच आहे. आता ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेमध्ये मोडतोड केली आहे अशा कारखान्यांवर कारवाई करुन व्याजासहित उर्वरीत रक्कम देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत 'एफआरपी' तो ही व्याजासकट पदरात पडेल
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 10:58 AM

अहमदनगर : (Sugarcane Sludge Season) ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आता एफआरपी अदा करण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे. त्यानुसार काही पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. मात्र, ही संख्या केवळ 47 एवढीच आहे. आता ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेमध्ये मोडतोड केली आहे अशा कारखान्यांवर कारवाई करुन व्याजासहित उर्वरीत रक्कम देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या मागण्यांच्या निवेदन त्यांना दिल्यानंतर हे आश्वासन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना काय आहे आवाहन

आता एफआरपी रक्कम अदा करण्याच्या प्रसंगी साखर कारखान्यांकडून वेगवेगळी आश्वासने ही शेकऱ्यांना दिली जाऊ शकतात. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी वेळेत एफआरपी रक्कम अदा केलेली आहे. उर्वरीत साखर कारखान्यांना 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केवळ तक्रार जरी केली तरी त्यांना थकीत एफआरपी रक्कम तर मिळणारच आहे पण त्यावरील व्याजही मिळवून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही केवळ तक्रारी करा असे आवाहन साखर आय़ुक्त यांनी केले आहे.

इथेनॅाल निर्मितीचा परिणाम एफआरपी रकमेवर

आता अनेक साखऱ कारखान्यांवर इथेनॅाल निर्मितीचे प्रकल्प उभारले गेले आहेत. यामाध्यामतून इथेनॅालची निर्मितीही सुरु झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखरेच्या उतारावर आणि एफआरपी रकमेवर झाला असल्याची बाब राजू शेट्टी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शिवाय ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेचे टप्पे केले आहेत त्यांच्यावर ‘आरआरसी’ ची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ऊसाच्या रसापासून बी हेवी मोलॅसीस, इथेनॅालची निर्मीती होत असल्याने उतार कमी येत आहे. त्याचा परिणाम आता एफआरपी रकमेवरही होणार आहे.

30 नोव्हेंबर अखेरची मुदत

कायद्यानुसार ऊस खेरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ रक्कम देणे बंधनकारक असते मात्र, अनेक कारखाने याचे पालनच करीत नाहीत. सन 2021-22 मधील गाळप हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात 155 साखर कारखाने हे सुरु झाले होते. यापैकी केवळ 47 साखर कारखान्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातील 108 साखर कारखान्यांनी ही रक्कम थकवली असून आता 15 दिवसांमध्ये हे थकीत साखर कारखाने काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली अन् खिलार बैलांची हजारांची किंमत लाखोंवर पोहचली

रब्बी हंगामात हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा, ‘असे’ करा व्यवस्थापन तरच उत्पादनात वाढ

महावितरण अन् शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिकटच, अशोक चव्हाणांनी सांगितला मधला मार्ग

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.