Sugarcane Sludge : हंगाम लांबला पण ‘जयवंत’ने अतिरिक्त उसाचा प्रश्नच निकाली काढला
धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 190 दिवसांच्या गळीत हंगामात 7 लाख 66 हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले.तर 8 लाख 28 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 12.40 टक्के इतका राहिलेला आहे. जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्प 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेने सुरू आहे.
सातारा : (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम संपण्यापेक्षा त्या साखर कारखान्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावला आहे का? हेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखाने गाळप संपवून धुराडी बंद करीत आहेत. यंदा वाढलेल्या क्षेत्रामुळे गाळप हंगाम लांबलेला आहे. कधी नव्हे ते 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ हंगाम सुरु राहिला आहे. असे असताना (Karad) कराडच्या ‘जयवंत शुगर’ने 190 दिवसांमध्ये 7 लाख 50 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. तर 8 लाख 28 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर कारखान्यांसाठी हंगाम चांगला राहिला मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावताना शेतकऱ्यांना मात्र कसरत करावी लागली होती. पण जयवंत शुगरने ऊसाचा प्रश्न मार्गी लावून गाळप बंद केले आहे. अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांचा सत्कार करुन गाळप हंगाम उरकता घेतला आहे.
चोख व्यवहार, शेतकऱ्यांना ऊसबिलही अदा
धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 190 दिवसांच्या गळीत हंगामात 7 लाख 66 हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले.तर 8 लाख 28 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 12.40 टक्के इतका राहिलेला आहे. जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्प 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेने सुरू आहे. या प्रकल्पात बी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती सुरु आहे. तसेच कारखान्याने 15 एप्रिलअखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 2 हजार 600 रुपयांप्रमाणे उसबिलाची रक्कम वर्ग केली आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी
अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यातच अधिक गंभीर झाला आहे. जयवंत शुगर्सने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. शिवाय ऊस उत्पादकांसोबते व्यवहारही रोखठोक राहिलेले आहेत. यंदा अतिरिक्त क्षेत्रामुळे हंगाम लांबलेले आहेत. मराठवाड्यात तर अणखीन तोडणीच सुरु आहे. जयवंत शुगर्सने मात्र, कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न उद्भवू दिला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. केवळ 190 दिवसांमध्ये 7 लाख 66 हजार मेट्रीक टन ऊस गाळप या साखर कारखान्याने पूर्ण केले आहे.
ऊस उत्पादकांना बील अ्न कामगारांचा सत्कार
जयवंत शुगर्स ने 15 एप्रिलपर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे बील उत्पादकांना अदा केले आहे. शिवाय ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच गाळप थांबवण्याचा निर्णय झाला होता.गाळप हंगाम पूर्ण होताना डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात आला. यंदा क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनात वाढ झाली पण उत्पन्नामध्ये नाही. त्यामुळे आगामी वर्षात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये असे नियोजन करणे गरजेचे आहे.