यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे.

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात
साखर
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 3:49 PM

पुणे : यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे यंदाच्या निर्यातीमध्ये वाढ होणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेत स्पष्ट केले आहे.

ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. या दरम्यानच्या काळात कच्च्या साखरेचे 30 लाख टनाचे करार झाले आहेत. अजूनही निम्म्यापेक्षा अधिकचे गाळप बाकी आहे. शिवाय काही साखर कारखाने तांत्रिक अडचणीमुळे उशिराने सुरु झाले होते. एकंदरीत साखरेचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक वातावरण असून यंदा विक्रमी निर्यात होणार असल्याचे साखर आयुक्त यांनी लंडन येथील जागतिक साखर परिषदेत सांगितले आहे.

साखरेबरोबरच इथेनॅालची निर्मिती

जागतिक परिषदेमध्ये पिकांच्या व्यापाऱ्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सोयाबीन, गहू पाठोपाठ साखरेचाच व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले होते. काळाच्या ओघात आता इथेनॅाल निर्मितीवर भर दिला जात असल्याने यामधील धोरणात्मक बाबी या परिषदेत उलगडून सांगण्यात आल्या होत्या. भारतामध्येही इथेनॅाल निर्मीतीमध्ये एक मोठी ताकद उभी केली जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरही भारताची भूमिका ही महत्वाची राहणार आहे.

यामुळे साखर निर्यातीला अनुदान नाही

भारतामधील साखरेच्या धोरणावर पाकिस्तान, ब्राझील, थायलॅंड या देशांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले आक्षेप आजही कायम आहेत. निर्यातीला अनुदान देऊ नये अशी या देशांची मागणी आहे. मात्र, देशातील उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की अनुदानाशिवाय साखरेची निर्यात करण्याची क्षमता भारत देशाने ठेवलेली आहे. याचा प्रत्यय यंदा येणार आहे. अद्याप गाळप हंगाम मध्यावर आला असताना 30 लाख टन साखरेचे करार झाले आहेत.

इथेनॅालच्या निर्मितीमध्ये साखरेची भूमिका महत्वाची

इथेनॅालच्या निर्मितीमुळे जगाच्या वाटचालीत साखर आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुले साखर उत्पादक देशांना जागतिक पातळीवर महत्व राहणार आहे. नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या सर्व बाबी ऊस आणि अन्नधान्यापासून मिळणार आहेत. त्यामुळे ऊसाचे महत्व भविष्यातही कायम राहणार आहे. ऊस उत्पादनात भारत हा आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’

आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा

अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.