खरिपातील पिकासह ऊसाचीही पडझड, लातुर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल
पावसाने खरिपातील पिकासह शेत जमिनीही खरडून गेल्या आहेत तर दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात लातुर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तब्बल 450 हेक्टरावरील ऊस हा आडवा झाला आहे. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले असून सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
लातुर : पावसाने खरिपातील पिकासह शेत जमिनीही खरडून गेल्या आहेत तर दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात लातुर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तब्बल 450 हेक्टरावरील ऊस हा आडवा झाला आहे. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले असून सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच आहे. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने जळकोट तालुक्यातील रावणकोळ, अतनूर, गुत्ती, होकर्णा, मेवापूर या गावच्या शिवारातील शेत जमिनीही खरडून गेल्या आहेत. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सुपिक गाळ शेतामध्ये टाकला होता. शिवाय पिक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. मात्र, यंदा अतिवृष्टीने होत्याच नव्हतं केलयं. खरिपातील पिके तर पाण्यात आहेतच परंतु, ज्या ऊसातून शेतकऱ्यांना अधिकची अपेक्षा होती तो ऊस देखील वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आडवा झाला आहे. शिरुर अनंतपाळ तसा दुष्काळी भाग, मात्र पिक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली होती. परंतू, दैठणा, शेंद, तीपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, डोंगरगाव, हालकी, येरोळ, शिवपुर, कंमबळगा या गावातील तब्बल 450 हेक्टरावरील ऊस हा आडवा झाला आहे. पावसामुळे केवळ खरिपातील पिकांचेच नाही तर सुपिक जमिनही खरडून गेली आहे तर ऊसही आडवा झाला आहे. असे तिहेरी नुकसान झाले असल्याने हेक्टरी 25 हजार रुपये मदत करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळीवणे गरजेचे
जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसह बागायत क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच नुकसानीची मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी ऊस उत्पादकाचे नुकसान
गतवर्षी चांगला दर असतानाही केवळ ऊस कारखान्यावर घालण्याच्या प्रसंगी वादळी वारे सुटल्याने ऊसाची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले. यंदाही ऐन वेळीच पावसाची अवकृपा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
विद्युतपंपही गेले वाहून
पिकाला पाणी देण्यासाठी विहीरीवर तसेच सिंचन असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विद्युत पंप ठेवले होते. पावसामुळे हे पंपही वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे तर नुकसान हे झालेच आहे शिवाय आर्थिक फटकाही सहन करावा लागला आहे.
नुकसान भरपाईचा केवळ गाजावाजा
पावसाने उघडीप देताच राजकीय नेते मंडळी बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करीत आहेत. मात्र, भरपाईच्या अनुशंगाने ना प्रशासनाने पाऊल उचलले आहे ना सरकारने. सरसकट नुकसान झाल्याचे ग्राह्य धरुन मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. Sugarcane also collapses along with kharif crop, farmers trouble in Latur district
इतर बातम्या :
आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?
खरिपातील ही दोन पिके बाजारात, कसे आहेत दर जाणुन घ्या…
आश्चर्य : वेताशिवाय 25 वर्षीय गाय देतेय दुध, कृषी तज्ञही झाले अवाक्