Sunflower: फरदड कापसाला काय आहे पर्याय? मशागत कमी अन् उत्पादन अधिक, वाचा सविस्तर

कापसाचे दर वाढत असताना शेतकऱ्यांनी फरदडच वावरामध्ये ठेवण्याचा निर्धार केला होता. परंतू, फरदडमुळे केवळ शेतजमिनीचेच नुकसान होत नाही तर बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भामुळे इतर पिकांनाही धोका आहे. याबाबत कृषी विभागाने जनजागृती केल्याने अखेर शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सुर्यफूलाची लागवड केली होती.

Sunflower: फरदड कापसाला काय आहे पर्याय? मशागत कमी अन् उत्पादन अधिक, वाचा सविस्तर
यंदा उन्हाळी हंगामात सुर्यफूलाचे क्षेत्र वाढले आहे.
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:00 AM

औरंगाबाद : वातावरणातील बदल आणि खरीप हंगामातील कापसावर वाढलेला बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे फरदड कापसाचे पीकाची काढणी करावी का नाही या मनस्थितीमध्ये मराठवाड्यातील शेतकरी होते. यातच (Cotton Crop) कापसाचे दर वाढत असताना शेतकऱ्यांनी फरदडच वावरामध्ये ठेवण्याचा निर्धार केला होता. परंतू, फरदडमुळे केवळ शेतजमिनीचेच नुकसान होत नाही तर बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भामुळे इतर पिकांनाही धोका आहे. याबाबत कृषी विभागाने जनजागृती केल्याने अखेर शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सूर्यफुलाची लागवड केली होती. अखेर दोन (Rabi Season) रब्बी हंगामातील महिन्यांनी हे पीक बहरात आले आहे. शिवाय मशागतीचा खर्च कमी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर झाला नसल्याने आता उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. रब्बी हंगामात (Farmer) शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी या पारंपारिक पिकांना फाटा देत कडधान्यावर अधिकचा भर दिलेला आहे. त्यामुळे बदल तर घडत आहे पण तो उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातूनही महत्वाचा ठरत आहे.

फरदड कापसामुळे काय नुकसान होते?

कापूस पिकाच्या फरदडमुळे उत्पादनात वाढ होणार असली तरी एकप्रकारे आपण बोंडअळीच्या वाढीलाच खतपाणी घालत असतो. त्यामुळे फरदड ही डिसेंबर अखेरपर्यंतच घेणे फायद्याचे ठरणार होते पण यामधून उत्पन्न मिळत असल्याने जानेवारीपर्यंत फरदड हे वावरातच होते. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकावरही होतो. फरदडमुळे कपाशीचा दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते. या वाणांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. या दुष्परिणामामुळे शेतकऱ्यांनी काढणी करुन या क्षेत्रावर सुर्यफूलाचा पेरा करणे पसंत केले आहे.

मशागत कमी अन् उत्पादन अधिक

कडधान्याच्या पेऱ्याबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायम धास्ती राहिलेली आहे. यंदा बदललेल्या परस्थितीमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. यातच पारंपारिक पिकापेक्षा बाजारपेठेचा अभ्यास करुन आता पीक घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सुर्यफूल क्षेत्रात वाढ होत आहे. 2016 नंतर दुष्काळजन्य परस्थिती आणि होत असलेले नुकसान पाहता मराठवाड्यात सुर्यफूलाचे उत्पादन क्षेत्र हे घटले होते. पण यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय कडधान्यांचे दरही वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा सुर्यफूल या कडधान्याचा प्रयोग केला आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम इतर पिकांवर झालेला असला तरी सुर्यफूल हे सुरक्षित आहे. शिवाय मशागतीचा खर्चही अधिक नसल्याने सध्या हे पीक बहरात आहे.

संबंधित बातम्या:

Sugarcane Sludge : राज्यात 5 लाख टन ऊसाचे गाळप, ‘या’ विभागाची आघाडी कायम

शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा ‘स्टॅच्यू’ उभारुन केली उतराई

Pomegranate Orchard : तेल्याचा सामना करण्यापेक्षा डाळिंब बागा तोडलेल्या बऱ्या, का होत आहेत शेतकरी हतबल?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.