Fertilizer : सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांना गोव्यातून खतपुरवठा, जिल्हा बॅंकेच्या मध्यस्तीने प्रश्न मार्गी
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खत पुरवठा हा महत्वाचा आहे. मात्र, यंदा सर्वत्रच खत टंचाई निर्माण झाली आहे. भारताला रशियातून सर्वाधिक खताची आयात होत असते पण यंदा युद्धजन्य परस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गला झुआरी खताचा पुरवठा केला जात होता. त्याच्यावर देखील परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता सुरळीत खत पुरवठा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
सिंधुदुर्ग : यंदा खरीप हंगामात (Fertilizer Shortage) खत टंचाईची समस्या ओढावणार आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. रासायनिक खत टंचाईचा परिणाम सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांवर होणार होता. मात्र, (District Bank) जिल्हा बॅंकेच्या मध्यस्तीने (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा प्रश्न मिटला आहे. येथील शेतकऱ्यांना गोवा सरकारकडून खताचा पुरवठा होत असतो. मात्र, टंचाईमुळे गेल्या काही दिवसांपासून खत पुरवठाच होत नव्हता. अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर या शिष्टमंडळाने अखेर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन झुआरी खत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पुरवठाच रखडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, खत पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
अनियमित खत पुरवठा
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खत पुरवठा हा महत्वाचा आहे. मात्र, यंदा सर्वत्रच खत टंचाई निर्माण झाली आहे. भारताला रशियातून सर्वाधिक खताची आयात होत असते पण यंदा युद्धजन्य परस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गला झुआरी खताचा पुरवठा केला जात होता. त्याच्यावर देखील परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता सुरळीत खत पुरवठा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
किती होणार खत पुरवठा?
अनियमित खत पुरवठ्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शिष्टमंडळाने गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. शिवाय येथील शेतकऱ्य़ांच्या अडचणी सांगितल्या. यावेळी झुआरी केमिकल्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी 1 हजार मेट्रिक टन युरिया तर 2 हजार मेट्रिक टन मिश्र खतांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवठा करण्याचे निर्देश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी झुआरी केमिकल कंपनीला दिले आहेत.
अशी झाली शेतकऱ्यांची अडचण
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासत आहे. आतापर्यंत उत्पादनात घट झाली पण भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी खत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात 14 हजार मेट्रिक टन खतांची आवश्यकता आहे. मात्र खत पुरवणाऱ्या कंपन्यांचा ताळमेळ नसल्याने अवघे 636 मेट्रीक टन खत मिळालंय. मागणीच्या तुलनेत 15 टक्के खत या दोन जिल्ह्यांना मिळत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.