Kharif Season : कृषी विभागाचा दिलासा, बियाणांचा पुरवठा- खतांबाबत मात्र सावध पवित्रा

शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप हंगामावरच अवलंबून आहे. शिवाय खरीप हंगामात सोयाबीन हे हुकमी पीक असून यंदा वेळेत पाऊस झाला तर राज्यात तब्बल 1 लाख 46 हजार हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज आहे. गतवर्षी 1 लाख 43 हजार हेक्टरावर पेरणी झाली होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नव्हते.

Kharif Season : कृषी विभागाचा दिलासा, बियाणांचा पुरवठा- खतांबाबत मात्र सावध पवित्रा
बियाणे
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:44 PM

पुणे : सध्या (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीची कामे देखील अंतिम टप्प्यात आहेत. वर्षभरात केवळ खरिपाच्या तोंडावर (Agricultural cultivation) शेती मशागतीचे काम करुन शेतकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतात. यंदा तर वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी ही कामे वेळेपूर्वीच उरकती घेतलेली आहेत. शिवाय (Seeds) बियाणांबाबत शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाहीतर रासायनिक खताचा वापर हा काळजीपूर्वकच करावा लागणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. शिवाय सर्वकाही पोषक वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे शेतशिवारातली कामे तर पूर्ण झाली आहेत शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती वेळेत पाऊस पडण्याची.

गतवर्षीपेक्षा यंदा जास्तीचा पेरा

शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप हंगामावरच अवलंबून आहे. शिवाय खरीप हंगामात सोयाबीन हे हुकमी पीक असून यंदा वेळेत पाऊस झाला तर राज्यात तब्बल 1 लाख 46 हजार हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज आहे. गतवर्षी 1 लाख 43 हजार हेक्टरावर पेरणी झाली होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नव्हते. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही सर्वकश प्रय़त्न केले आहेत. मान्सून वेळेत दाखल झाला तर शेतकऱ्यांनी केलेला निर्धार य़शस्वी ठरणार आहे.

18 लाख क्विंटल बियाणे

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 18 लाख क्विटंल बियाणे पुरवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले गेले आहे. हे बियाणे खासगी असून एवढ्या मूबलक प्रमाणात पुरवठा झाल्यास टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करु नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि कमी किंमतीमध्ये बियाणे उपलब्ध करुन देण्यावर प्रत्येकाचाच भऱ राहिलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 3 ते 4 लाख हेक्टराने क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

कापूस बियाणांवरील निर्बंध कायम, पेऱ्यावर परिणाम

सध्या सोयाबीन व इतर पिकांच्या बियाणांची खरेदी केली जात असली तरी कापूस बियाणे मात्र बाजारात मिळत नाही. कारण कृषी विभागाने 1 जून नंतर कापसाचे बियाणे विक्रीची परवानगी कृषी सेवा केंद्रांना दिली आहे. वेळेपूर्वीच कापसाची लागवड केली तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो हे दरवर्षीच्या निरिक्षणातून निदर्शनास आले आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यावर जमिनीचा पोत तर खराब होतोच पण इतर पिकांच्या उत्पादनावरही परिणाम हा होतोच. त्यामुळे कृषी विभागाने 1 जून पासूनच कापूस बियाणे विक्रीची पवागनी दिली आहे.

बियाणांचे नियोजन, खताचे काय ?

राज्यात यंदा 1 लाख 47 हजार हेक्टरावर खरिपाची पेरणी होईल असा अंदाज आहे. त्यानुसार 17.95 लाख क्विंटल बियाणांचा आवश्यकता आहे. असे असताना 18 लाख क्विंटलचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे बियाणांचा चिंता नसली तरी खताबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खताचा पुरवठा हा आयातीवरच अवलंबून आहे.त्यामुळे खताच्या किंमतीमध्ये वाढ होणार नसली तरी पुरवठा होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.